व्हायरल दावे ज्यांनी फेटाळून लावले कि दाभलकर हे दवाखान्यात नव्हते तसेच त्यांची मृत्यू झाली नाही सगळे खोटे आहे. नारायण दाभाडकर यांचे कोरोनाव्हायरस ने निधन झाले, ते इंदिरा गांधी रुग्णालय, नागपूर येथे भरती होते.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): मनाला हेलावून टाकणारी तसेच माणुसकी अजून जागृत आहे असे दर्शवणारी घटना नागपुरात घडली, जिथे ८५ वर्षाचे नारायण दाभाडकर यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसासाठी स्वतःचा कोविड रुग्णालयातील बेड सोडला आणि घरी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पण हि घटना समोर आल्यापासून बऱ्याच लोकांनी याचे खंडन केले, आणि तसेच नारायण दाभाडकर नावाचा इसम दवाखान्यात नव्हताच आणि तसेच त्यांचा मृत्यू देखील झाला नाही असे दावे इंटरनेट वर व्हायरल होताना दिसले. दवाखान्याचे डीन यांची देखील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यात सांगण्यात येत आहे कि दाभाडकर त्यांच्याकडे ऍडमिट नव्हते. विश्वास न्यूज च्या तपासात हे सगळे दावे खोटे असल्याचे समजले, तसेच दाभाडकर हे इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल झाले होते आणि घरी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू देखील झाला, हे आमच्या तपासात समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
नारायण दाभाडकर यांच्या मृत्यू ची गोष्ट खोटी आहे आणि तसेच ते कधी दवाखान्यात दखलच झाले नव्हते असा दावा करणारे बरेच पोस्ट इंटरनेट वर व्हायरल होत आहे.
ट्विटर यूजर Rohan @rohanreplies ने एक ऑडिओ क्लिप शेअर केली आणि लिहले: NarayanDabhadkar story. Superintendent of Indira Gandhi Hospital Nagpur, Ajay Prasad has rubbed off such story saying it is false news and no such patient was admitted in Indira Gandhi Hospital. Why do you need such fake stories? Just to gain sympathy for what you haven’t done!
हा ट्विट नंतर दिलेले करण्यात आला पण तुम्ही त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघू शकता.
तसेच एका मोठया मराठी वृत्तपत्रांनी देखील एक fact check केले, त्याचे शीर्षक होते: “खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का?; जाणून घ्या काय घडलं?“
एडिट करायच्या आधी, त्यांच्या आर्टिकल मध्ये देखील व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप चा समावेश होता. त्यांनी आर्टिकल च्या सगळ्यात शेवटी लिहले होते: सोशल मीडियावर या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दाभाडकरांनी करोना रुग्णासाठी बेडचा त्याग केल्याचं दिसून येत नाही.
या वृत्तपत्राने पण, नंतर स्वतःचे मत बदलले आणि संपूर्ण आर्टिकल नारायण दाभाडकर यांचे परिवार आणि दवाखान्यातील अधिकाऱ्यांसोबत बोलून एडिट केले. विश्वास न्यूज ने हे आर्टिकल एडिट व्हायच्या आधीच आर्काइव्ह करून ठेवले होते, ते तुम्ही इथे बघू शकता.
व्हाट्सअँप वर देखील एक पोस्ट व्हायरल होत आहे जी एबीपी माझा ची असल्याचे सांगण्यात येत आहे, या बातमीत दावा करण्यात आला आहे कि नारायण दाभाडकर हे जिवंत आहे आणि सुखरूप आपल्या परिवाराकडे आहे. हि पोस्ट खाली बघा.
तपास:
विश्वास न्यूज ला असे बरेच पोस्ट दिसले ज्यात दावा करण्यात येत होता कि हि घटना नागपूर ची आहे.
आम्हाला असेच एक व्हायरल होत असलेले वृत्तपत्राचे कात्रण दिसले, ज्यात डेटलाईन लोकमत न्यूज नेटवर्क अशी दिली गेली होती, म्हणजेच हे एक नागपूरचे वृत्तपत्र होते.
हे कात्रण खाली बघा.
आम्हाला इंटरनेट वर बरेच मीडिया रिपोर्ट्स मिळाले ज्यात नारायण दाभाडकर यांच्या बद्दल सांगितले गेले होते. या बातम्या इथे वाचा.
इंटरनेट वर व्हायरल होत असलेल्या दाव्यांमुळे, विश्वास न्यूज ने आधी ज्या दवाखान्याचे उल्लेख केला आहे त्या हॉस्पिटल चा शोध घेण्याचे ठरवले. मीडिया रिपोर्ट मध्ये इंदिरा गांधी हॉस्पिटल, गांधी नगर चा उल्लेख केला गेला होता.
नागपुरात इंदिरा गांधी नावाचे दोन रुग्णालय आहेत- पहिले इंदिरा गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ज्याला मेयो देखील म्हणतात जे सेंट्रल एव्हेन्यू ला आहे आणि दुसरे इंदिरा गांधी हॉस्पिटल, जे गांधी नगर ला आहे.
जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती मेयो चे डीन डॉ अजय प्रसाद यांची होत आहे, जेव्हाकी वृत्तपत्रात डॉ अजय हरदास यांचा उल्लेख आहे.
विश्वास न्यूज ने इंदिरा गांधी रुग्णालय चे कॉवीड इन्चार्ज, डॉ अजय हरदास यांना संपर्क केला.
त्यांनी आम्हाला सांगितले कि नारायण दाभाडकर हे त्यांच्या रुग्णालयात भरती होते आणि त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येत होते. त्यांनी हे देखील मान्य केले कि दाभाडकर यांची ऑक्सिजन ची पातळी कमी झाली होती त्यांच्यावर उपचार झाल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधार देखील झाला होता पण तरी त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी दाभाडकर यांना घरी न्यायचा हट्ट धरला आणि नंतर ते त्यांना घेऊन देखील गेले. पण या मागचे कारण आम्हाला माहिती नाही.
विश्वास न्यूज सोबत बोलताना इंदिरा गांधी रुग्णालयाचे सुप्रीटेंडेंट, डॉ शिलू चिमुरकर गंटावर यांनी देखील सांगितले कि नारायण दाभाडकर त्या दवाखान्यात भरती होते आणि कॅजुअलटी वॉर्ड मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते असताना वॉर्ड मध्ये एक पण बेड रिकामा नव्हता.
आम्हाला फेसबुक वर दाभाडकर यांची मुलगी, आसावरी दाभाडकर कोठीवान यांचा देखील एक व्हिडिओ मिळाला, जो ओंकार दाभाडकर यांनी शेअर केला होता. त्यात त्यांनी संपूर्ण घटनेचे कथन केले आहे. त्यात त्यांनी सांगितले कि नारायण दाभाडकर यांनी आपल्या घरच्यांना त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी व्हिडिओ मध्ये हे देखील म्हंटले कि एक परिवार सारखे विनवण्या करत होते ज्यामुळे त्यांना वाईट देखील आले. आसावरी यांनी हे देखील म्हंटले कि नारायण दाभाडकर यांचे घरीच निधन झाले.
हा व्हिडिओ इथे बघा.
महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्या स्टेट जनरल सेक्रेटरी, शिवानी दाणी वखरे, यांनी देखील आपल्या फेसबुक पोस्ट वर नारायण दाभाडकर यांचे दवाखान्यातील छायाचित्र, DAMA (Discharge Against Medical Advice) चे पत्र आणि त्यांच्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
विश्वास न्यूज सोबत हे DAMA चे पत्र एका नागपूरच्या वरिष्ठ पत्रकाराने देखील शेअर केले. तुम्ही ते खाली बघू शकता.
आता विश्वास न्यूज ने हे तपासून बघितले कि एबीपी माझा नि खरच नारायण दाभाडकर हे सुरक्षित असल्याची कोणती बातमी घेतली होती का हे बघितले. त्यात आम्हाला एबीपी माझा ने ट्विटर वर या पोस्ट संदर्भात दिलेले स्पष्टीकरण सापडले, ज्यात त्यांनी असे म्हंटले कि एबीपी माझा ने अशी कुठलीच बातमी अपलोड केले नाही.
एबीपी माझा ची पोस्ट इथे बघा.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने नारायण दाभाडकर यांची मुलगी, आसावरी दाभाडकर कोठीवान यांना संपर्क केला. रागावलेल्या आसावरी ने सांगितले कि त्यांचे बाबा संपूर्ण आयुष्य जगले आणि कधीच स्वतःच्या भावनांचे भांडवल केले नाही आणि कुटुंबियांना पण या घटनेला इतकी प्रकाशझोतात आणण्याची इच्छा नव्हती, घरी परत यायचा निर्णय त्यांनी सर्वस्वी स्वतः घेतला.
“इंटरनेट वर विविध दावे पाहून आम्हाला अक्षरशः नैराश्य आले आहेत, चीड येत आहे. जर कोणाचा दावा असेल कि माझे बाबा जिवंत आहेत तर त्यांनी त्यांना घरी आणावे आम्हाला आनंदच होईल. आम्ही अजूनपण या शोकातून बाहेर आलो नाही आणि ह्या असल्या दाव्यांनी आम्हाला त्रासच होत आहे,” त्या म्हणाल्या.
शेवटी विश्वास न्यूज ने त्या व्यक्तीचा सोशल बॅकग्राऊंड चेक केला ज्याने व्हायरल ऑडिओ क्लिप शेअर केली होती. आम्हाला कळले कि @rohanreplies हे अकाउंट आता अस्तित्वात नाही.
निष्कर्ष: व्हायरल दावे ज्यांनी फेटाळून लावले कि दाभलकर हे दवाखान्यात नव्हते तसेच त्यांची मृत्यू झाली नाही सगळे खोटे आहे. नारायण दाभाडकर यांचे कोरोनाव्हायरस ने निधन झाले, ते इंदिरा गांधी रुग्णालय, नागपूर येथे भरती होते.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923