Fact Check: एक महिला टॅपिंग एक्सरसाईस शिकवत असल्याचा व्हिडिओ टाटा मेमोरियल हॉस्पिटल चा असल्याचा दावा, व्हायरल दावा दिशाभूल करणारा

टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ, द परफेक्ट हेअल्थ, हैदराबाद चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ विविध सोशल नेटवर्किंग साईट वर आढळला. असा दावा करण्यात येत होता कि हा व्हिडिओ मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल चा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. हा व्हिडिओ टाटा मेमोरियल हॉस्पिटल चा नसून, ओम साईराम परफेक्ट हेल्थ, हैदराबाद चा आहे, हे एक ऍक्युप्रेशर क्लिनिक आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा दिसला. या व्हिडिओ मध्ये एक महिला, लोकांना टँपिंग एक्सरसाईस चे महत्व सांगताना दिसते. हा व्हिडिओ टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे नाव वापरून व्हायरल केला जात आहे.

फेसबुक पेज सोन चिरैया ने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: Please ये video की जानकारी पूरी देखे आप को भी स्वस्थ संबंधित कुछ जानकारी मिल 🙏🙏👏👏Tata memorial hospital request everyone to watch this video. This is not normal forward. It is very important. Please forward the same in your group. Pls start Practicing Everyday.

हि पोस्ट आणि याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ अश्याच दाव्यासह व्हायरल करत आहेत.

तपास:
InVid या टूल चा वापर करून विश्वास न्यूज ने आपला तपास सुरु केला. आम्ही काही महत्वाचे स्क्रिनग्रेब आणि किफ्रेम्स काढले. या फ्रेम्स वर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च चा उपयोग करून खरा व्हिडिओं शोधण्यास सुरुवात केली
आम्हाला हा सर्च करताना, एक फेसबुक पेज मिळाला, The Perfect Health Hyderabad.

या पेज वर आम्हाला बरेच ऍक्युप्रेशर व्हिडिओस दिसले ज्यात व्हायरल व्हिडिओ मधील महिला देखील होती. आणि त्यांची वेबसाईट देखील मिळाली. ह्या पेज वर आम्हाला व्हायरल व्हिडिओ देखील मिळाला.

या वेबसाईट वर आम्हाला बरीच महत्वाची माहिती मिळाली.
आम्हाला असे कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली महिला हि कन्सलटन्ट मनीषा आहे. ती हैदराबाद मधली प्रसिद्ध डाईटिशिअन आहे, त्यांनी या क्लिनिक ची सुरुवात १९९५ मध्ये केली आणि २००५ पासून त्या पूर्ण वेळ ऍक्युप्रेशर डाईट थेरपी ला वेळ देत आहेत.
या क्लिनिक बद्दल अधिक माहिती तुम्ही इथे बघू शकता.

या पूर्ण वेबसाईट वर कुठेच असे म्हंटले नाही आहे कि कन्सल्टंट मनीषा या टाटा मेमोरियल हॉस्पिटल सोबत संबंधित आहेत.

हा व्हिडिओ टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या नावाने शेअर करण्यात येत असल्यामुळे आम्ही मुंबई येथील ह्या दवाखान्याला मेल द्वारे संपर्क केला.

डॉ सी एस प्रमेश, एम एस, एफ आर सी एस, डायरेक्टर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, प्रोफेसर, थोरॅसिक सर्जरी यांनी आम्हाला इमेल द्वारे उत्तर दिले आणि म्हंटले, “तुमच्या मेल साठी आभार. मी याची पुष्टी करू शकतो कि जो तुम्ही व्हिडिओ आणि टेक्स्ट माझ्यासोबत शेअर केला तो खोटा आहे. व्हायरल होत असलेल्या दाव्याचा आणि व्हिडिओ चा टाटा मेमोरियल हॉस्पिटल सोबत काही संबंध नाही. आम्हाला सत्य जाणून घेण्यास संपर्क केल्याबद्दल धन्यवाद“.

आता हे स्पष्ट होत कि मनीषा यांचा व्हिडिओ टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या नावाने शेअर करण्यात येत होता. ज्या यूजर नि हा व्हिडिओ शेअर केला, त्याचे आम्ही सोशल बॅकग्राऊंड चेक देखील केले. पेज सोन चिरैया या पेज ला 3,770 लोकं लाईक करतात आणि 5,318 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ, द परफेक्ट हेअल्थ, हैदराबाद चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट