बिहार निवडणुकांच्या वेळी दरभंगा-मुजफ्फरपुर सीमेवर बीएसएफ च्या जवानांच्या बस ची दुर्घटना झाली होती पण त्यात कुठल्याच जवानाचा मृत्यू झाला नव्हता, हा व्हायरल दावा भ्रामक आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप फॅक्ट चेकिंग चॅट बोट (+91 95992 99372) वर बिहार मध्ये झालेल्या एका दुर्घटनेचा पोस्ट फॅक्ट चेकसाठी मिळाला. या पोस्ट मध्ये दावा केला गेला होता कि बिहार च्या दरभंगा मध्ये झालेल्या दुर्घटनेत बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) जवानांनी भरलेली बस पलटल्याने ९ जवानांची मृत्यू झाली. दाव्या प्रमाणे, हे जवान चुनावासाठी चालले होते. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा भ्रामक ठरला. बिहार निवडणुकांच्यावेळी एक बीएसएफ जवानांची बस दरभंगा मध्ये दुर्घटनाग्रस्त नक्की झाली होती पण त्यात कुठल्या जवानांची मृत्यू झाली नव्हती.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला व्हाट्सअँप वर फॅक्ट चेक करता यूजर कडून जो दावा मिळाला तो आम्हाला बाकी सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसला. Hiren Gajera नावाच्या एका यूजर चा ट्विट आम्हाला मिळाला, व्हायरल ट्विट ला शेअर करून त्यांनी लिहले होते, “#बहुत_दुखद #दरभंगा में @BSF_India के जवानों से भरी बस पलटी, 9 जवान शहीद, कई घायल, चुनाव कराने जा रहे थे बीएसएफ जवान, कटरा थाना इलाके की घटना है… परमकृपालु परमात्मा सभी सदगत् जवानों की दिव्य आत्मा को परम शांति दे ऐसी प्रार्थना सह ॐ शांति शांति।”
अर्थात: खूप दुःखद, बीएसएफ जवानांनी भरलेली एक बस दरभंगा मध्ये पालटली आणि त्यात ९ जवान शाहिद झाले तर बरेच जखमी झाले, ते सगळे निवडणुकांकरता निघाले होते, हि घटना कटरा ठाण्यातील आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने काही महत्वाचे कीवर्ड वापरून, सगळ्यात आधी हा व्हायरल दावा कुठे इंटरनेट वर मिळतो का त्याचा तपास केला. आम्हाला ४ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेली यूएनआई एजेन्सी ची एक बातमी मिळाली. या रिपोर्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे मुजफ्फरपुर-दरभंगा च्या सीमेवर बीएसएफ जवानांनी भरलेली एक बस पालटली होती, त्या बद्दल माहिती दिली होती. या दुर्घटनेत १० लोकं घायाळ झाले होते त्यातील ९ हे बीएसएफ चे जवान होते. यात कुठल्याच बीएसएफ जवानाच्या निधनेची माहिती दिली नव्हती.
आम्ही व्हायरल पोस्ट सोबत जे छायाचित्र शेअर केले आहे, ते गूगल रिव्हर्स सर्च च्या मदतीने सर्च केले. ह्या छायाचित्रावरून आम्हाला बरेच रिजल्ट मिळाले. आम्हाला सन्मार्ग लाईव्ह न्यूज प्लॅटफॉर्म या वेबसाईट वर असलेल्या एका फोटो गॅलरी च्या सेक्शन मध्ये हे छायाचित्रदिसले दिसले. या फोटोगॅलेरी मध्ये छायाचित्रासोबत बिहार मधील दुर्घटनेची माहिती दिली आहे.
विश्वास न्यूज च्या तपासादरम्यान आम्हाला, ५ नोव्हेंबर २०२० रोजी दैनिक जागरण मध्ये प्रकाशित एक रिपोर्ट देखील मिळाली. या रिपोर्ट मध्ये, बस दुर्घटनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. रिपोर्ट प्रमाणे, सगळ्या जवानांना, सिंहावडा पीएचसी मध्ये भरती केले होते. रिपोर्ट मध्ये, पीएचसी चिकित्सा प्रभारी, डॉक्टर प्रेमचंद प्रसाद यांनी सांगितले आहे कि घायाळ जवानांची स्तिथी धोक्याच्या बाहेर आहे.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात अशी एक पण अधिकृत बातमी नाही मिळाली, ज्यात जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. आम्ही या संबंधी मुझफरपूर च्या कटरा पोलिसांसोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि घटना जुनी आहे आणि यात कोणत्याच बीएसएफ जवानाची मृत्यू झाली नाही. सगळ्या जवानांना उपचारानंतर डिस्चार्ज झाला.
विश्वास न्यूज ने या घाटाने संबंधात दैनिक जागरण च्या दरभंगा च्या दरभंगा ब्यूरो चीफ संजय उपाध्याय यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि बस ची दुर्घटना झाली पण यात कोणत्या जवानाची मृत्यू झाली नाही.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा करणाऱ्या यूजर चे ट्विटर हॅन्डल सोशल सकॅनिंग द्वारे तपासले. हा ट्विटर हॅन्डल ऑगस्ट २०१४ रोजी बनवण्यात आला होता आणि प्रोफाइल वर दिलेल्या माहितीनुसार, यूजर सुरत चे रहिवासी आहेत, फॅक्ट चेक च्या वेळी यूजर चे ६७ फॉलोवर्स होते.
निष्कर्ष: बिहार निवडणुकांच्या वेळी दरभंगा-मुजफ्फरपुर सीमेवर बीएसएफ च्या जवानांच्या बस ची दुर्घटना झाली होती पण त्यात कुठल्याच जवानाचा मृत्यू झाला नव्हता, हा व्हायरल दावा भ्रामक आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923