Fact Check: आमदार मुकेश वर्मा ह्यांनी भाजप सोडल्याचा दावा दिशाभूल करणारा, जुनी बातमी होत आहे व्हायरल

आमदार मुकेश वर्मा ह्यांनी भाजप पक्ष जानेवारी 2022 मधेच सोडला. व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. जुनी बातमी आताची सांगून, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Fact Check: आमदार मुकेश वर्मा ह्यांनी भाजप सोडल्याचा दावा दिशाभूल करणारा, जुनी बातमी होत आहे व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला TV9 न्यूज चॅनलची एक न्यूज क्लिप व्हायरल होताना आढळली ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील आमदार मुकेश वर्मा इतर 20 आमदारांसह भाजप सोडत आहेत आणि सपामध्ये सामील होत आहेत असे सांगण्यात येत आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले आहे. मुकेश वर्मा यांनी भाजप सोडली पण जानेवारी 2022 मध्ये.
विश्वास न्यूजला हा दावा दिशाभूल करणारा वाटला.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sanjeev Gaurav Kumar ने व्हायरल क्लिप शेअर केली आणि दावा करत लिहले: बीजेपी से विधायक श्री मुकेश वर्मा ने भाजपा छोड़ी सपा जॉइन की

ह्या व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

ट्विटर यूजर देखील हा व्हिडिओ अश्याच काही दाव्यांसह शेअर करत आहेत.

https://twitter.com/salam0786786/status/1583889973329031169?s=20&t=SzPAOjGnFtMWEHSIrCSFfg
https://twitter.com/AkshatJ91945219/status/1584068876681502720?s=20&t=VtLO15Lb4iAo8g-ulGN6Rg

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात किवर्ड सर्च पासून केली.
आम्हाला व्हायरल होत असलेली न्यूज क्लिप TV9 Bharatvarsh च्या फेसबुक पेज वर सापडली.

हि क्लिप फेसबुक वर 14 जानेवारी, 2022 रोजी शेअर करण्यात आली होती.

आम्हाला TV9 Bharavarsh च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर देखील हि क्लिप सापडली. ह्या पेज ला 12.2 मिलियन स्बस्क्राइबर्स आहेत. हा व्हिडिओ 14 जानेवारी, 2022 रोजी शेअर करण्यात आला आणि त्याला 32 लाख व्हियू आहेत.

आम्ही ह्या घटनेच्या न्यूज रिपोर्ट्स मिळतात का ते सुद्धा तपासून पहिले.

आम्हाला हिंदुस्थान टाइम्स वर 13 जानेवारी, 2022 रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली ज्याचे शीर्षक होते: “UP election: Another jolt to BJP as MLA Mukesh Verma quits party”

बातमीत सांगितल्याप्रमाणे: उत्तर प्रदेशचे आमदार मुकेश वर्मा विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्ष सोडणारे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सातवे आमदार ठरले. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वर्मा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे प्रमुख मागास जातीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा दर्शवला.

आम्हाला NDTV च्या वेबसाईट वर देखील हि बातमी सापडली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ गुरुप्रकाश पासवान ह्यांच्यासोबत संवाद साधला. ते म्हणाले, “मुकेश वर्मा यांनी भाजप सोडल्याचा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. जानेवारी 2022 मध्ये त्यांनी यूपीतील शिकोहाबादमधून भाजप पक्ष सोडला आणि हे अलीकडेच घडले नाही. भाजप हा एक कुटुंब आहे आणि ज्या लोकांनी पक्ष सोडला आहे ते कधी ना कधी परत येतातच. असे आधीही झाले आहे. व्हायरल होत असलेला दावा खरा नाही.”

शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल दावा करणाऱ्या यूजर चा तपास केला. Sanjeev Gaurav Kumar ह्यांचे फेसबुक वर 1.6K मित्र आहेत ते जैथरा, उत्तर प्रदेश चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: आमदार मुकेश वर्मा ह्यांनी भाजप पक्ष जानेवारी 2022 मधेच सोडला. व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. जुनी बातमी आताची सांगून, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट