Fact Check: व्हिएन्ना मध्ये जलवायू परिवर्तन च्या प्रदर्शनाचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि कळले कि व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. व्हिडिओ एडिटेड आहे आणि त्याचा भारत किंवा युक्रेन-रुस सोबत काही संबंध नाही. खरा व्हिडिओ ऑस्ट्रिया च्या व्हिएन्ना मधील विरोध प्रदर्शनाचा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ वर न्यूज 24 चा लोगो असलेला दिसतो. ह्या व्हिडिओ मध्ये लोकं मृतकांसारखे झोपलेले दिसतात आणि एक व्यक्ती रिपोर्टींग करताना दिसतो. हा व्हिडिओ शेअर करताना लोकं दावा करत आहे कि भारतीय मीडिया युक्रेन मध्ये मारल्या गेलेल्या व्यक्तींचे फिल्मनकं करत आहेत आणि मोदी सरकार च्या नाकामीया दाखवत आहे. ह्या वेळी एक मृत व्यक्ती उठून स्वतःच्या अंगावरचे कापड व्यवस्थित करताना दिसत आहे, पुढे दावा करण्यात येत आहे कि मीडिया चे खोटे पकडले गेले आहे. व्हायरल व्हिडिओ चा तपास केल्यावर लक्षात आले कि दावा पूर्णपणे खोटा आहे, व्हिडिओ एडिटेड आहे आणि त्याचा भारताशी काही संबंध नाही, हा व्हिडिओ ऑस्ट्रिया च्या व्हिएन्ना मधील विरोध प्रदर्शनाचा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Alok Raghunandan ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: ‘पीछे वाले को ढंग से मर तो जाने देते। भारतीय मीडिया का शर्मनाक चेहरा देखिए इन दलालो के लिए चप्पल के बजाय कुछ और विकल्प सोंचा जाना चाहिए।’

पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. बरेच यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत युक्रेन चा व्हिडिओ असल्याचा दावा करत आहे.

https://twitter.com/humlogindia/status/1498715816938053637

तपास:
विश्वास ने व्हायरल पोस्ट च्या तपासाची सुरुवात हा व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड केला. व्हायरल व्हिडिओ चे बरेच स्क्रीन ग्रेब्स आम्हाला मिळाले, ह्या नंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून ओरिजिनल सोर्स चा तपास करण्यास सुरुवात केली. ह्या वेळी आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ 4 फेब्रुवारी, 2022 रोजी ऑस्ट्रिया च्या एका युट्युब चॅनेल OE24 वर अपलोड केलेला दिसला. कॅप्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, हा व्हिडिओ ऑस्ट्रिया मध्ये जलवायू नीती ला घेऊन विरोध प्रदर्शन चा आहे. खरा व्हिडिओ पाहिल्यावर समजले कि हा व्हिडिओ क्रॉप केलेला आहे, ह्या सोबतच व्हायरल व्हिडिओ क्लिप वर न्यूज 24 चा लोगो लागलेला आहे आणि सोबतच एक हिंदी ऑडिओ देखील जोडण्यात आलेला आहे.

तपासाच्या वेळी आम्हाला खरा व्हिडिओ OE24.TV च्या वेबसाईट वर अपलोड केलेला मिळाला. खऱ्या व्हिडिओ मध्ये 29 सेकंदावर लोकं जलवायू नितीनच्या विरोधात बॅनर घेऊन उभे दिसतात. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, रिपोर्टर चे नाव मार्विन बर्गाउर असे आहे.

सर्च पुढे नेट आम्ही मार्विन बर्गाउर ह्यांचे सोशल मीडिया हॅन्डल तपासले. ह्या वेळी आम्हाला हा व्हायरल व्हिडिओ मार्विन बर्गाउर ह्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट वर मिळाले. व्हायरल व्हिडिओ चे स्पष्टीकरण देत मार्विन बर्गाउर ने लिहले: व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रिया च्या जलवायू नीतींचा आहे ह्या व्हिडिओ चा रुस आणि युक्रेन च्या युद्धसोबत काही संबंध नाही.

अधिक माहिती साठी आम्ही न्यूज 24 चे पत्रकार प्रभाकर मिश्रा ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ वर आमच्या चॅनेल चा लोगो लावण्यात आला आहे पण आम्ही अशी रिपोर्ट केली नाही.

तपासाच्या शेवटी आम्ही दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर च्या अकाउंट चा तपास केला. त्यात कळले कि यूजर चे सात शे पेक्षा जास्ती फोल्लोवर्स आहेत. Alok Raghunandan उत्तर प्रदेश लखनऊ चे रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि कळले कि व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. व्हिडिओ एडिटेड आहे आणि त्याचा भारत किंवा युक्रेन-रुस सोबत काही संबंध नाही. खरा व्हिडिओ ऑस्ट्रिया च्या व्हिएन्ना मधील विरोध प्रदर्शनाचा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट