Fact Check: उत्तराखंड चा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह होत आहे व्हायरल
लक्सर विधानसभा उत्तराखंड मध्ये येते, जिथून भाजप उम्मेदवार संजय गुप्ता निवडणूक लढत आहे, जेव्हाकी उत्तर प्रदेश मध्ये आमदार संजय कुमार गुप्ता निवडणूक लढत आहे. व्हायरल व्हिडिओ चा उत्तर प्रदेश सोबत काही संबंध नाही.
- By: Sharad Prakash Asthana
- Published: Feb 12, 2022 at 11:29 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विधानसभा निवडणूक 2022 च्या संदर्भात एक 21 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. ह्यात भाजप उम्मेदवार संजय गुप्ता ह्यांचे प्रचार वाहन चिखलात फसलेले दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि उत्तर प्रदेश च्या डबक्यांमध्ये हि गाडी फसली आहे.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि संजय गुप्ता भाजपा च्या तिकिटावर उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मधून निवडणूक लढत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश चा नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mahesh Singh ने 7 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट करून लिहले: संजय गुप्ता आगे कैसे बढ़ेंगे। वो तो केशव मौर्या की गड्डा युक्त सड़कों में फंस गए हैं।
तपास:
व्हायरल दाव्याच्या तपासाच्या वेळी आम्ही आधी हा व्हिडिओ नीट बघितला. प्रचार वाहन वरील बोर्ड वर ‘विधानसभा लक्सर—34 से भाजपा उम्मीवार संजय गुप्ता‘ असे लिहले आहे. ह्यानंतर आम्ही किवर्ड सर्च द्वारे ‘विधानसभा लक्सर—34′ चा तपास केला. जागरण मध्ये प्रकाशित ह्या प्रोफाइल प्रमाणे, हि विधानसभा सीट उत्तराखंड च्या हरिद्वार जिल्ह्यात येते. हरिद्वार जिल्ह्यात दहा विधानसभा सीट आहेत. लक्सर चा विधानसभा क्रमांक आहे 34. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत संजय गुप्ता इथूनच जिंकले होते.
30 जानेवारी 2022 मध्ये आज तक मध्ये प्रकाशित बातमी प्रमाणे, संजय गुप्ता लक्सर वरून दोन द आमदार म्हणून निवडून आले आहे. तिसऱ्यांदा ते परत भाजप तर्फे लढत आहे.
लक्सर मध्ये दैनिक जागरण चे संवाद सूत्र रजनीश ह्यांचे म्हणणे आहे कि लक्सर विधानसभा उत्तराखंड च्या हरिद्वार जिल्ह्यात येते. इथून भाजप कडून संजय गुप्ता लढत आहे. व्हायरल व्हिडिओ जवळपास दहा दिवस जुना आहे.
संजय गुप्ता बद्दल अजून तपास केल्यावर आम्हाला दैनिक जागरण मध्ये छापून आलेली एका बातमी ची लिंक मिळाली. 18 जानेवारी 2022 रोजी छापून आलेल्या बातमी प्रमाणे, संजय गुप्ता आचार संहिता च्या केस मध्ये फसले आहे.
myneta प्रमाणे, संजय कुमार (संजय कुमार गुप्ता) चायला विधानसभा चे आमदार आहे. उत्तर प्रदेश मध्ये त्यांच्या विधानसभा चा क्रमांक 253 आहे. ते उत्तरप्रदेश मध्ये स्थित आहे.
2 फेब्रुवारी मध्ये जागरण मध्ये छापून आलेल्या बातमी प्रमाणे, चायल सीट अपना दल (एस) च्या खात्यात गेली आहे. तिथून नागेंद्र सिंग पटेल ह्यांना तिकीट दिले गेले आहे.
व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह फेसबुक यूजर Mahesh Singh ह्यांनी आपल्या प्रोफाइल वर शेअर केला आहे, ते एका राजनेतिक विचारधारेने प्रभावित आहे.
निष्कर्ष: लक्सर विधानसभा उत्तराखंड मध्ये येते, जिथून भाजप उम्मेदवार संजय गुप्ता निवडणूक लढत आहे, जेव्हाकी उत्तर प्रदेश मध्ये आमदार संजय कुमार गुप्ता निवडणूक लढत आहे. व्हायरल व्हिडिओ चा उत्तर प्रदेश सोबत काही संबंध नाही.
- Claim Review : भाजपा उम्मीदवार संजय गुप्ता का प्रचार वाहन उत्तर प्रदेश की सड़क के गड्ढों में फंसा
- Claimed By : FB User- Mahesh Singh
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.