Fact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये धावणाऱ्या स्पेशल ट्रेनचा आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Jan 3, 2022 at 09:41 PM
- Updated: Sep 12, 2024 at 05:50 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका ट्रेन चा व्हिडिओ लोकं शेअर करून दावा करत आहेत कि नवं वर्ष साजरी करण्यास तेजस ट्रेन ला नवीन रूप देण्यात आले. विडिओ मध्ये लाईट्स ने सजलेली एक ट्रेन झाडांमधून निघताना दिसते. ह्या व्हिडिओ ला शेअर करून दावा करण्यात येत आहे कि मुंबई ते गोआ जाणारी ट्रेन, तेजस चा हा व्हिडिओ आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हिडिओ चा भारत रेल्वे सोबत काहीच संबंध नाही. हा व्हिडिओ ख्रिसमस आणि न्यू इयर ला इंग्लंड मध्ये चालवल्या गेलेल्या विशेष ट्रेन चा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Akash Jaiswal ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले: तेजस एक्स्प्रेस,मुंबई ते गोवा।
इथे व्हायरल मेसेज ला जसे च्या तसे प्रस्तुत केले आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून बघा. फेसबुक यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल दाव्याच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही किफ्रेम्स काढले आणि त्यांना गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. ह्या वेळी आम्हाला व्हायरल व्हिडिओ इंग्लंड च्या एका प्रोफेशनल फोटोग्राफर स्कॉट विलियम्स च्या फेसबुक अकाउंट वर 24 नवंबर 2012 रोजी अपलोड केलेला सापडला. कॅप्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, स्कॉट विलियम्स ने हे दृश्य इंग्लंड च्या गुडिंगटन रूट वर घेतले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही काही कीवर्डद्वारे गूगल वर शोधले. यादरम्यान, आम्हाला इंग्लंडच्या डेव्हनलाइव्ह वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक मीडिया रिपोर्ट प्राप्त झाला. 4 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या या वृत्तानुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ट्रेनचे नाव “ट्रेन ऑफ लाईट्स” आहे. द ट्रेन ऑफ लाइट्स ही डार्टमाउथ स्टीम रेल्वे आणि रिव्हर बोर्ड कंपनीद्वारे दक्षिण-पश्चिम इंग्लंडमध्ये ख्रिसमसच्या वेळी दरवर्षी धावणारी विशेष ट्रेन आहे. यावर्षी ही ट्रेन 24 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत चालवण्यात आली होती.
अधिक माहितीसाठी आम्ही इंग्लंडमधील डार्टमाउथ स्टीम रेल्वेची वेबसाइट पाहण्यास सुरुवात केली. यादरम्यान आम्हाला ट्रेन ऑफ लाईट्सचे इतर अनेक चित्र आणि व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केलेले आढळले. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ही ट्रेन 24 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत चालवण्यात आली होती.
पुढील तपास करत आम्ही भारतीय रेल्वेचे सीपीआरओ दीपक चतुर्वेदी ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेला व्हिडिओ आम्ही त्याच्यासोबत व्हाट्सअँपवर शेअर केला आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. यावेळी रेल्वेने नववर्षानिमित्त काही खास तयारी करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, हा दावा खोटा असून, या व्हिडिओचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नाही असे त्यांनी सांगितले.
तपासाअंती, आम्ही फेसबुक वापरकर्ता आकाश जयस्वालचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून, आम्हाला कळले की फेसबुकवर यूजर चे 300 पेक्षा जास्त मित्र आहेत. आकाश जयस्वाल हा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये धावणाऱ्या स्पेशल ट्रेनचा आहे.
- Claim Review : तेजस ट्रेन चा व्हिडिओ
- Claimed By : Akash Jaiswal
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.