UDF उमेदवार उमा थॉमस यांच्यासाठी महिला काँग्रेसने केरळमधील कोची येथे आयोजित केलेल्या निवडणूक प्रचार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शशी थरूरचा व्हिडिओ, राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा कार्यकर्त्यांसोबत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित चिंतन शिबिराचा असल्याचा दावा करण्यात जात आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ केरळ मधील कोची चा आहे, जिथे थरूर यूडीएफ उम्मीदवार उमा थॉमस च्या प्रचाराच्या अभियानाचा आहे. महिला काँग्रेसने तयार केलेल्या निवडणूक गीताच्या विमोचनप्रसंगी त्यांनी स्वत: कार्यकर्त्यांसोबत नाचण्यास सुरुवात केली. तोच व्हिडिओ काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिराचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Ravi Tiwari’ ने व्हायरल वीडियो (आर्काइव्ह लिंक) ला शेअर करून लिहले: *उदयपुर चिंतन शिविर मे गंभीर चिंतन करते शशि थरूर चाचा।”
अन्य यूजर्स देखील मिळत्या जुळत्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
19 मे 2022 रोजी जनसत्ताच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘केरळमधील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सहकारी महिला कार्यकर्त्याचा हात धरून जोरदार आक्रोश केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यावर यूजर्सनी अनेक कमेंट्स केल्या.
यूट्यूब सर्चमध्ये ‘Kaumudy Global’ वर 19 मे रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओ बुलेटिनमध्येही याचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ केरळमधील एका पक्षाच्या कार्यक्रमादरम्यानचा आहे, जेव्हा थरूर यांनी एका निवडणुकीच्या गाण्याच्या लॉन्चिंगवेळी महिला कार्यकर्त्यांसोबत नाचायला सुरुवात केली होती.
keralakaumudi.com ने ह्या वेबसाईट वर 19 मे 2022 रोजी प्रकाशित रिपोर्ट प्रमाणे, “कोचीमध्ये, काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे थिराकारा येथील UDF उमेदवार उमा थॉमस यांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात (निवडणूक गाण्याच्या रिलीजच्या निमित्ताने) महिला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत पाय हलवताना दिसतात.”
थरूर ने 18 मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर प्रोफाइल वर देखील ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पार्श्वसंगीत म्हणून एक हिंदी गाणे वाजत आहे, तर मूळ व्हिडिओमध्ये थरूर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मल्याळममध्ये गाताना ऐकू येत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत विश्वास न्यूजने केरळ काँग्रेसचे मीडिया समन्वयक किरण ओएस यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थानमध्ये आयोजित काँग्रेसच्या चिंतन शिविरशी संबंधित नाही, तर तो केरळ काँग्रेसने विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आयोजित केलेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीशी संबंधित आहे.
व्हायरल व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर करणाऱ्या युजरने त्याच्या प्रोफाइलमध्ये स्वत:चे मुंबई, महाराष्ट्र येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
निष्कर्ष: UDF उमेदवार उमा थॉमस यांच्यासाठी महिला काँग्रेसने केरळमधील कोची येथे आयोजित केलेल्या निवडणूक प्रचार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शशी थरूरचा व्हिडिओ, राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923