Fact Check: पैराट्रूपर्स चा हा व्हिडिओ जुना आहे, रुस-युक्रेन सोबत ह्याचा काही संबंध नाही

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि शेअर करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओ जवळपास पाच वर्ष जुना आहे. ह्या व्हिडिओ चा आताच्या युक्रेनच्या स्तिथी सोबत काहीच संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): युक्रेन वर रुस चे हल्ले सुरु असताना त्यासंबंधी बरेच दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि चित्र व्हायरल होत आहेत. ह्या संबंधी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आकाशात पेराशुट सारखं काही दिसत. यूजर्स हा व्हिडिओ शेअर करून दावा करत आहेत कि हा व्हिडिओ युक्रेनवर हल्ल्यांचा आहे. विश्वास न्यूज ने जेव्हा ह्या पोस्ट चा तपास केला त्यात आम्हाला कळले कि हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे. व्हायरल व्हिडिओ जवळपास पाच वर्ष जुना आहे, ह्याचा सध्याच्या युक्रेनच्या स्तिथी सोबत संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर्स हा पोस्ट शेअर करून दावा करत आहे: रूस-यूक्रेन में तनाव बढ़ गया है यूक्रेन में खार्कोव के पास रूसी अर्धसैनिक बल उतर रहे हैं।
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आपल्या तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करण्या पासून केली. त्याचे बरेच स्क्रीनग्रेब्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. सर्च मध्ये आम्हाला हा व्हिडिओ 2019 मध्ये एका वेबसाईट वर अपलोड केलेला मिळाला. ह्या व्हिडिओ सोबत दिलेल्या माहिती प्रमाणे, हा व्हिडिओ खार्किव मधील पॅराट्रूपर्स चा असल्याचे सांगितले होते.

विश्वास न्यूज ने तपास सुरूच ठेवला, त्यात कळले कि हा व्हिडिओ सप्टेंबर 2016 मध्ये एका ट्विटर हॅन्डल वर मिळाला. इथे देखील पॅराट्रूपर्स उतरल्याचे व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले होते.

https://twitter.com/BeloFFRus/status/772445426570125312?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E772445426570125312%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-old-video-of-paratroopers-landing-viral-after-ukraine-russia-war%2F

आता हे स्पष्ट झाले होते कि हा जुना व्हिडिओ आहे जो आता सध्याच्या संदर्भासोबत व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2016 पासून इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या शिवाय विश्वास न्यूज ने युक्रेन च्या फॅक्ट चेकिंग टीम ला इमेल द्वारे संपर्क केला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर हे आर्टिकल अपडेट करण्यात येईल.

फेसबुक यूजर ज्याने हा दावा केला, त्याचे बॅकग्राऊंड चेक केल्यावर असे समजले कि यूजर ला 2954 लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि शेअर करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओ जवळपास पाच वर्ष जुना आहे. ह्या व्हिडिओ चा आताच्या युक्रेनच्या स्तिथी सोबत काहीच संबंध नाही.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट