Fact-check: लॉकडाऊन दरम्यान मजुरांच्या स्थलांतराचा हा व्हिडिओ मुंबईचा नाही, तर दिल्लीच्या आनंद विहारचा आहे
श्रमिक कामगारांच्या स्थलांतराचा जो व्हिडिओ मुंबईच्या दहिसर चेक नाक्याचा म्हणून व्हायरल होतोय, तो दिल्लीच्या आनंद विहारचा मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे.
- By: Abhishek Parashar
- Published: May 22, 2020 at 04:33 PM
- Updated: Aug 30, 2020 at 07:58 PM
नवी दिल्ली, विश्वास टीम: संपूर्ण देशावर कोरोनावायरसचे सावट आहे, त्यातच देशभरात लॉकडाऊन मुळे विविध राज्यातील मजूर स्थलांतरित होत आहे. असे असताना, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आढळला. असा दावा केला जात आहे कि हा व्हिडिओ, मुंबईच्या दहिसर चेक नाक्याचा आहे.
विश्वास न्यूज ने या दाव्याचा तपास केले असता तो खोटा असल्याचा दिसले. मुळात हा व्हिडिओ, मुंबई चा नसून दिल्लीच्या आनंद विहार चा आहे.
काय होतंय व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Syed Abdul Mussavir’ ने वीडियो (आर्काइव लिंक) शेअर करून लिहले, “Dahisar Check Naka #MigrantLabourers”
फेसबुक वर अनेक यूजर ने हाच व्हिडिओ विविध दाव्यांसोबत शेअर केला.
तपास:
सुमारे एक मिनिट 10 सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये श्रमिक कामगार एका लांब रांगेत चालताना दिसतात. हा व्हिडिओ विश्वास न्यूज ने इनविड मध्ये अपलोड केला आणि त्या नंतर ज्या मुख्य फ्रेम्स मिळाल्या त्याला आम्ही रिवर्स इमेज सर्च केले. त्यातून आम्हाला बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ अपलोड केल्याचे दिसले. त्या यूजर नि हा व्हिडिओ दिल्लीच्या आनंद विहार चा म्हणून अपलोड केला आहे. 28 मार्च 2020 रोजी ‘@shahidsiddiqui’ ने स्वतःच्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये, व्हायरल झालेल्या व्हिडिओ चा काही भाग सापडला.
हा व्हिडिओ ज्या व्यक्तीने बनवला त्याचा आवाज स्पष्ट त्यात ऐकू येतो, ‘मी दीपक पालीवाल हा व्हिडिओ बनवित आहे. हा दिल्लीच्या आनंद विहाराच्या बस स्टॅन्ड आहे. 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजताचे हे दृश्य दिल्लीच्या आनंद विहार बस स्टँडच्या सभागृहाचे आहे.’
या दाव्याची पुष्टी करण्यासाठी, वरील व्हिडिओ मध्ये आढळलेले शब्द आम्ही कीवर्ड म्हणून सोशल सर्च केले. या तपासामध्ये आम्हाला याच तारखेचा एक ट्विट सापडला. ज्यात वापरलेली छायाचित्रे हि आनंद विहाराची असून, त्यात वेळ पण ४ वाजताचीच नमूद केलेली आहे. सोशल मीडिया सर्च मध्ये आम्हाला ‘@iamnarendranath’ च्या वेरिफाइड ट्विटर हैंडल वर 28 मार्च रोजी अपलोड केलेले दोन छायाचित्र सापडले. ट्विट मध्ये म्हंटल्या प्रमाणे हे छायाचित्र दिल्ली यूपी-बॉर्डर च्या कौशाम्बी जवळचे सांगितले गेले आहे. छायाचित्र शेअर करताना त्यांनी लिहले, कौशाम्बी (दिल्ली-यूपी बॉर्डर) के बस स्टॉप पर 4 बजे का सीन…हमारी टीम की ओर से ली गयी तस्वीर।’
यू-ट्यूब सर्च मध्ये आम्हाला २८ मार्च चा हिंदी न्यूज चॅनेल, ‘ABP’ च्या यू-ट्यूब चैनल वर अपलोड केलेले व्हिडिओ बुलेटीन देखील सापडले, ज्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओ च्या दृश्यांचा पण समावेश आहे.
पूर्व दिल्ली कव्हर करणारे आमचे सहयोगी दैनिक जागरण चे वरिष्ठ रिपोर्टर शुजाउद्दीन ने सांगितले, ‘हा दिल्लीच्या आनंद विहारचा जुना व्हिडिओ आहे.’ ते म्हणाले, ‘जेव्हा देशात लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा काही अफवांमुळे सगळे श्रमिक कामगार आनंद विहार येथे जमा झाले होते. त्यांना असे समजले होते कि त्यांच्या गावी जाणाऱ्या ट्रेन ची व्यवस्था येथून करण्यात आली होती.’
व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर च्या पेज ला 20 हजार हुन अधिक लोक फॉलो करतात आणि 12 हजार हुन जास्ती लोकांनी त्याला लाईक केले आहे.
निष्कर्ष: श्रमिक कामगारांच्या स्थलांतराचा जो व्हिडिओ मुंबईच्या दहिसर चेक नाक्याचा म्हणून व्हायरल होतोय, तो दिल्लीच्या आनंद विहारचा मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे.
- Claim Review : Dahisar Check Naka…
- Claimed By : Syed Abdul Mussavir
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.