Fact Check: व्हिडिओ मध्ये दिसत असलेले डान्सर्स माणसं आहेत, रोबोट्स नाही
विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हिडीओमध्ये दिसणारे दोन्ही डान्सर रोबोट नसून खरे मनुष्य आहेत.
- By: Pallavi Mishra
- Published: Jun 3, 2022 at 10:22 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन डान्सर्स परफॉर्म करताना दिसत आहेत. या दोन डान्सर्स माणसं नसून रोबोट असल्याचा दावा या पोस्टसोबत केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हिडीओमध्ये दिसणारे दोन्ही डान्सर रोबोट नसून खरे मनुष्य आहेत.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडिओ सोबत दावा करण्यात येत आहे: दोस्तों…यह नृत्य शंघाई के डिज्नीलैंड की जगह का है। इसकी खूबी है कि यह दोनों रोबोट है। इतनी बारीकियां और नृत्य को इस कदर दर्शाया गया है कि यह पूरी दुनिया में छाया है। यह 5 मिनट का नृत्य है जिसको देखने के लिए 4 घंटे लाइन में लगने पड़ते हैं करीब 5 मिनट के इस नृत्य को देखने के लिए $75 खर्च करने पड़ते हैं… फिलहाल 47 सेकंड का यह वीडियो आपके लिए एकदम फ्री है
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
या व्हिडिओचा तपास आम्ही हा व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड करण्यापासून केला आणि त्याचे मुख्य फ्रेम्स काढले. मग गुगल रिव्हर्स इमेजवर या कीफ्रेम शोधले. 2020 मध्ये dimaydilara नावाच्या इंस्टाग्राम पेजवर दुसऱ्या अँगल ने अपलोड केलेला या दोन नर्तकांचा समान व्हिडिओ आम्हाला आढळला. पोस्टसोबतच्या कॅप्शननुसार, हा परफॉर्मन्स मॉस्कोमधील बचाटा स्टार्स वीकेंड कार्यक्रमादरम्यान चित्रित करण्यात आला होता आणि क्लिपमध्ये दिसणारे नर्तक रशियन बचाटा नृत्यांगना दिमा आणि दिलारा आहेत.
आम्हाला ह्या दोन डान्सर्स चे अजून काही व्हिडिओ देखील ह्या पेज वर मिळले.
आम्हाला dj.don.corazon नावाच्या Instagram पेजवर 2020 मध्ये अपलोड केलेला हा व्हिडिओ देखील आढळला. तसेच येथे लिहिलेल्या वर्णनानुसार, हा व्हिडिओ मॉस्कोमधील बचाता स्टार्स वीकेंड दरम्यान चित्रित करण्यात आला होता आणि येथे दिमा आणि दिलारा या रशियन नृत्यांगना दिसल्या.
विश्वास न्यूजने या प्रकरणाबाबत शांघाय कव्हर करणारे चिनी पत्रकार जॅक लू यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “हा व्हिडिओ चीनचा नाही. हा दावा खोटा आहे. शांघाय डिस्नेलँडमध्ये कोणताही रोबोट असा परफॉर्म करत नाही.”
आम्ही दोघं पण डान्सर्स सोबत देखील संपर्क साधला आहे, त्यांचे उत्तर आल्यावर फॅक्ट चेक अपडेट करण्यात येईल.
हि पोस्ट हँसते रहो इंडिया नावाच्या पेज वर Anuj Sri ह्या यूजर ने शेअर केले होते. पेज चे फेसबुक वर 551.3K मेम्बर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हिडीओमध्ये दिसणारे दोन्ही डान्सर रोबोट नसून खरे मनुष्य आहेत.
- Claim Review : यह नृत्य शंघाई के डिज्नीलैंड की जगह का है इसकी खूबी है कि यह दोनों रोबोट है इतनी बारीकियां और नृत्य को इस कदर दर्शाया गया है कि यह पूरी दुनिया में छाया है यह 5 मिनट का नृत्य है जिसको देखने के लिए 4 घंटे लाइन में लगने पड़ते हैं करीब 5 मिनट के इस नृत्य को देखने के लिए $75 खर्च करने पड़ते हैं... फिलहाल 47 सेकंड का यह वीडियो आपके लिए एकदम फ्री है
- Claimed By : हँसते रहो इंडिया
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.