Fact Check: कलाकारांद्वारे बनवलेला स्क्रिप्टेड व्हिडिओ लोकं खरा मानून करत आहे शेअर

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल व्हिडिओ कलाकारांद्वारा बनवण्यात आला आहे, जो लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने बनवला आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर नमाज वाचत असलेल्या एका महिलेची मदत करत असलेल्या एका साधूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला नमाज वाचताना दिसते, ह्या मध्ये एक मुलगा येऊन तिची पर्स चोरण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तेवढ्यात एक साधू मागून येऊन त्याला पकडतो आणि महिलेचे सामान चोरी जाण्यापासून वाचवतो. काही वेळा नंतर चोर साधूला धक्का देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरतो. जेव्हा महिला नमाज वाचून उठते, तेव्हा साधू ती पर्स वापस आणून देतात. महिला त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करते पण साधू महिलेला आशीर्वाद देऊन निघून जातात.
सोशल मीडिया वर लोकं ह्या घटनेला सत्य समजून सोशल मीडिया वर शेअर करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि काही कलाकारांनी बनवला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर The Dream ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत लिहले आहे: हिंदू बाबा ने एक मुस्लिम महिला को बचाया।
हा पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूज ने हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करून त्याचे किफ्रेम्स काढले. त्यानंतर त्यांना गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. आम्हाला ह्या वेळी खरा व्हिडिओ प्रिया नावाच्या एका वेरिफाइड फेसबुक अकाउंट वर 6 जून 2017 रोजी अपलोड केला असल्याचा समजला. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, हे एक स्क्रिप्टेड नाटक आहे, ज्याला जागृकते करता बनवले गेले आहे.

ह्यानंतर आम्ही प्रिया चा पेज तपासला, त्या दरम्यान आम्हाला माहिती झाले कि हा एक स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे. बरेच व्हिडिओ खूप मजाक वाल्या मुद्द्यांवर बनवण्यात आले आहे तसेच बरेच गंभीर मुद्द्यांवर देखील आधारित आहेत, हे सगळे व्हिडिओ कलाकारच बनतात. हे सत्य नसतात.

अधिक माहिती साठी आम्ही प्रिया ला संपर्क केला, त्यांनी सांगितले आम्हाला सांगितले व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ शिक्षा आणि मनोरंजन च्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. हे पहिल्यांदाच नाही आहे कि आमचे स्क्रिप्टेड व्हिडिओ लोकांनी खरे समजून शेअर केले आहे. आधी बऱ्याच वेळा हे शेअर करण्यात आले आहे. आम्ही ह्यावर केलेले अनेक फॅक्ट चेक तुम्ही इथे बघू शकता.

तपासाच्या शेवटी आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला, त्याचे सोशल स्कॅनिंग केल्यावर आम्हाला कळले कि यूजर चे फेसबुक वर पाच शे पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत. हा पेज 13 मार्च 2020 पासून सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल व्हिडिओ कलाकारांद्वारा बनवण्यात आला आहे, जो लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने बनवला आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट