X
X

Fact Check : वेब सिरीस च्या शूटिंग चा व्हिडिओ दहशतवादी च्या नावावर व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले या नावावर व्हायरल होणार व्हिडिओ एका वेब सिरीस च्या शूटिंग चा व्हिडिओ आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पोलिसांच्या काही गाड्या दिसतात. यूजर्स यात दावा करत आहे कि साऊथ मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले.

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. आम्हाला समजले कि हा व्हिडिओ एका वेब सिरीस च्या शूटिंग चा आहे जी लोकं आता सत्य घटना म्हणून शेअर करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Neem Tada ने १७ फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याबरोबर लिहले, साऊथ मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले. यूजर ने लिहले: ‘साउथ मुंबइ पाययधुनी ऐरीयासे आतंकवादी पकडेगये है’

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल मध्ये वेग-वेगळे कीवर्ड टाईप करून हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, कि खरंच मुंबई मध्ये इतक्यात कुठले दहशतवादी पकडले गेले का. गूगल सर्च मध्ये आम्हाला कुठेच अशी बातमी मिळाली नाही जी या व्हिडिओ ची पुष्टी करेल.

या नंतर विश्वास न्यूज ने या संदर्भात पायधुनी पुलिस स्‍टेशन चे सीनियर पीआई सुभाष दुधगांवकर यांच्यासोबत वार्तालाप केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा एका वेब सिरीस च्या शूटिंग सोबत जुडलेला व्हिडिओ आहे. काही लोकं या व्हिडिओ ला खोट्या दाव्यासह शेअर करत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी या भागात एका वेब सिरीस ची शूटिंग झाली होती.

आम्ही त्या यूजर च्या अकाउंट चा तपास केला ज्याने हा खोटा व्हिडिओ शेअर केला होता. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर Neem Tada ने हा जुलै २०१७ मध्ये बनवला होता.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले या नावावर व्हायरल होणार व्हिडिओ एका वेब सिरीस च्या शूटिंग चा व्हिडिओ आहे.

  • Claim Review : साऊथ मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले.
  • Claimed By : Neem Tada
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later