X
X

Fact check: केरळ मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या नावावर, महाराष्ट्रातील धुळ्याचा व्हिडिओ व्हायरल

केरळ मधील चक्रीवादळाच्या नावाने जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. हा व्हिडिओ २०१९ चा आहे, जेव्हा राज्यात वायू चक्रीवादळ आले होते.

  • By: Ankita Deshkar
  • Published: May 31, 2021 at 04:07 PM
  • Updated: May 31, 2021 at 06:55 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच दोन चक्रीवादळ भारतावर आपला परिणाम दाखवून गेले, असे असताना वादळाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. विश्वास न्यूज ला असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना आढळला. या व्हिडिओ ला हजारोंनी व्युस मिळाले आहेत आणि दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ केरळ चा आहे.
विश्वास न्यूज ने या व्हिडिओ चा तपास केला. आणि त्यात कळले कि हा व्हिडिओ केरळ चा नसून महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे ते पण २०१९ चा.  

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Dachhan Marwah ने २१ मे रोजी एका चक्रीवादळाचा व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले कि केरळ च्या चक्रीवादळ चे व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये एका फॅक्टरी चा आजूबाजूचा परिसर दिसतो. त्यात चक्रीवादळाच्या वाऱ्यांनी सामान आणि तसेच एक गाडी देखील हलताना दिसते. या व्हिडिओ ला १०१ लोकांनी शेअर केले आहे आणि तसेच साडे पाच हजार व्युज देखील आहे.  
हा व्हिडिओ आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाच्या सुरुवातील व्हिडिओ एकाग्रतेने ऐकला आणि बघितला. आम्हाला असे लक्षात आले कि या व्हिडिओ मधील लोकं मराठीत वार्तालाप करत आहेत. लोकांना त्यात स्पष्टपणे म्हणताना एल्कलें जाऊ शकते, ‘गाडी चालली पहा‘.
याचा अर्थ स्पष्ट आहे कि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असू शकतो.

विश्वास न्यूज ला अजून गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, या फेसबुक पोस्ट वर एका व्यक्ती ने कंमेंट केली होती आणि त्यात लिहले होते, ‘ओल्ड’ म्हणजेच हा व्हिडिओ जुना असला पाहिजे असे देखील लक्षात आले.

नंतर आम्ही याच व्हिडिओ चा स्क्रीनग्रेब घेतला आणि त्याला गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमाने शोधले. असे करताना आम्हाला अमर उजाला न्यूज ची एक लिंक मिळाली ज्यात या व्हिडिओ चा वापर करण्यात आला होता.
हा व्हिडिओ १५ जून २०१९ रोजी अपलोड केला गेला आणि त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, धुळे, महाराष्ट्र.

त्यानंतर आम्ही धुळे, महाराष्ट्र टाकून देखील या व्हिडिओ चा तपास केला.
हा व्हिडिओ नवभारत टुडे नावाच्या एका युट्युब चॅनेल ने देखील प्रसारित केला होता. हा व्हिडिओ १५ जून २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता.

ह्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “चक्रीवादळ वायू धुळे, महाराष्ट्र“.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने धुळे स्थित, वरिष्ठ पत्रकार, प्रशांत परदेशी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि जो व्हिडिओ आता केरळ चा सांगून व्हायरल होत आहे तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. धुळ्याच्या एमएडीसीतील हा व्हिडिओ २०१९ मधला आहे.

आम्हाला अजून एक व्हिडिओ मिळाला जो १२ जून २०१९ रोजी उपलोड केला गेला होता. हा व्हिडिओ मराठी न्यूज चॅनेल, ‘न्यूज १८ लोकमत’ चा होता.
हा व्हिडिओ इथे बघा:

विश्वास न्यूज ने ज्या पेज ने हा व्हिडिओ शेअर केला, त्याचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. ‘Dachhan Marwah’ चे ३२.७ हजार फॉलोवर्स आहेत आणि ह्या पेज वर सहसा व्हायरल व्हिडिओस शेअर केलेले दिसतात.

निष्कर्ष: केरळ मधील चक्रीवादळाच्या नावाने जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो महाराष्ट्रातील धुळ्याचा आहे. हा व्हिडिओ २०१९ चा आहे, जेव्हा राज्यात वायू चक्रीवादळ आले होते.

  • Claim Review : केरळ मधील चक्रीवादळ
  • Claimed By : Dachhan Marwah
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later