Fact Check: उर्फी जावेद नाही आहे जावेद अख्तर यांच्या नात, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. शबाना आज़मी ह्यांनी ट्विट करून ह्या गोष्टीची पुष्टी केली कि उर्फी जावेद चा गीतकार जावेद अख्तर ह्यांच्याशी काही संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि बिग बॉस ओटीटी मधून बाहेर पडलेली पहिली कन्टेस्टंट उर्फी जावेद हि लिरिसिस्ट आणि सॉन्ग राइटर जावेद अख्तर यांची नात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. शबाना आझमी ने एक ट्विट करुन स्पष्ट केले होते कि उर्फी जावेद हिचा गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत काहीच संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

राणा जितेश हिन्दू नावाच्या एका यूजर ने फेसबुक वर उर्फी जावेद यांचे एक चित्र शेअर केले आणि सोबत लिहले: “#यहउर्फीजावेद है, #जावेदअख्तर की पोती. #मुंबईएयरपोर्टपरइसकापहनावादेखिए जावेद अख्तर #शरियत और डर की बात करता है और ज्ञान देता फिरता है। बाकी उर्फी पूरा #पाकिस्तानदिखातेहुए #शरियतकोचुनौतीदेरहीहैं 🤭🙄🙄 #तालिबानीचाहकलोगबताओ, #इसकोशरियाकानूनकेअनुसारक्यासजाबनतीहैं #पोस्टकेलिएक्षमाचाहतेहै🙏🙏

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी कीवर्ड च्या मदतीने व्हायरल पोस्ट चा तपास सुरु केला. आम्हाला अभिनेत्री आणि जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आज़मी यांचा एक ट्विट मिळाला, ज्यात लिहले होते कि उर्फी जावेद हि त्यांच्यासोबत कोणत्याच प्रकारे संबंधित नाही आहे.

शबाना आज़मी च्या ह्या ट्विट वर एक बातमी आम्हाला www.jagran.com वर देखील मिळाली.

ह्यानंतर आम्ही उर्फी जावेद हे कीवर्डस मध्ये टाकून सर्च केले. theancestory.com प्रमाणे, त्या लखनऊ मध्ये राहतात आणि त्या एक टीव्ही अभिनेत्री आहेत.

विश्वास न्यूज ने या संदर्भात उर्फी जावेद यांना संपर्क केला. आमच्या सोबत फोन वर बोलताना त्यांनी सांगितले, “मी जावेद अख्तर ची नात नाही. माझा त्यांच्यासोबत काही संबंध नाही.

आम्ही व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर राणा जितेश हिन्दू ह्यांच्या प्रोफाइल ला स्कॅन केले. आम्हाला कळले कि यूजर पटना चे रहिवासी आहेत. यूजर चे 718 फ़ॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. शबाना आज़मी ह्यांनी ट्विट करून ह्या गोष्टीची पुष्टी केली कि उर्फी जावेद चा गीतकार जावेद अख्तर ह्यांच्याशी काही संबंध नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट