उत्तर प्रदेश मध्ये मिनी लोकडाऊन नाही लावण्यात येत आहे, व्हायरल पोस्ट मध्ये केलेले दावे चुकीचे आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि कोरोनाव्हायरस च्या वाढत्या केसेस ला लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकार ने मिनी लोकडाऊन लावायचा निर्णय घेतला आहे. या मिनी लोकडाऊन मध्ये आठवड्याच्या दार शनिवार आणि रविवारी लोकडाऊन राहील या दिवशी बाजार आणि सगळे कार्यालये बंद राहतील.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि उत्तर प्रदेश सरकार मिनी लोकडाऊन लावत नाही आहे. व्हायरल पोस्ट मध्ये केलेले दावे खोटे आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Raj Kumar Kasia ने हि पोस्ट शेअर केली आणि लिहले:
लखनऊ
कोरोना को लेकर यूपी सरकार का बड़ा फैसला
यूपी सरकार का ‘मिनी लॉकडाउन’ फार्मूला
संक्रमण नियंत्रण के लिए ‘मिनी लॉकडाउन’ होगा
यूपी में अब हर हफ्ते लगेगा वीकेंड लॉकडाउन
सप्ताह में 2 दिन प्रदेश में लागू होगा लॉकडाउन
हफ्ते में 2 दिन सभी दफ्तर, बाजार रहेंगे बंद
प्रदेश में शनिवार और रविवार रहेगा लॉकडाउन
अब हफ्ते में 5 दिन खुलेंगे बाजार और दफ्तर
शनिवार, रविवार को बंद रहेंगे दफ्तर, बाजार
प्रदेश में अब हर हफ्ते लगेगा वीकेंड लॉकडाउन
अर्थात:
लखनऊ
कॉरोन ला घेऊन युपी सरकार चा मोठा निर्णय
युपी सरकार चा मिनी लोकडाऊन फॉर्मुला
संक्रमण नियंत्रित करायला होईल मिनी लोकडाऊन
युपी मध्ये आता प्रत्येक आठवड्यात लागेल वीकएंड लोकडाऊन
आठवड्यातील २ दिवसांकरता लागेल लोकडाऊन
आठवड्यात दोन दिवस बाजार आणि सगळे कार्यालय बंद राहतील
प्रदेशात शनिवारी आणि रविवारी लोकडाऊन राहील
आता आठवड्यातील ५ दिवस बाजार आणि कार्यालये सुरु राहतील
प्रदेशात आता प्रत्येक आठवड्यात लागेल वीकएंड लोकडाऊन
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
विश्वास न्यूज ला आपल्या वॉट्सऐप चैटबॉट नंबर 9599299372 वर देखील हि पोस्ट फॅक्ट चेक करता मिळाली.
तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये केलेल्या दाव्याला आम्ही सगळ्यात आधी इंटरनेट वर कीवर्डस वापरून शोधले. आम्हाला १३ जुलै रोजी जागरण च्या वेबसाईट वर प्रकाशित हि बातमी मिळाली. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या सरकार ने कोरोनाव्हायरस ला लढा देण्यासाठी उत्तर प्रदेश मध्ये मिनी लोकडाऊन लावले होते. बातमी प्रमाणे शनिवारी आणि रविवारी लोकडाऊन लावून, मोठ्या प्रमाणावर साफ सफाई आणि सॅनिटाईझशन चे काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आम्हाला उत्तर प्रदेश ची सद्य स्थती जाणून घ्यायची होती, म्हणून आम्ही इंटरनेट सर्च केले त आम्हाला एक आर्टिकल मिळाले. त्याच्या प्रमाणे, २५ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश चे स्वास्थ्य मंत्री जयप्रताप सिंह यांनी स्पष्ट केले कि कोविड19 ची स्थिती नियंत्रणात आहे आणि कॉम्म्युनिटी स्प्रेड ची पण स्थिती सध्या नाही, म्हणून उत्तर प्रदेश मध्ये सध्या लोकडाऊन पण नाही लागणार आणि बॉर्डर पण सील नाही केले जातील.
विश्वास न्यूज ने दैनिक जागरण डिजिटल चे लखनऊ ब्यूरो चे सहकारी धर्मेंद्र पांडे यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि सध्या उत्तर प्रदेश मध्ये लोकडाऊन नाही लागत आहे, स्वास्थ्य मंत्री यांनी बुधवारीच याची माहिती दिली होती.
फेसबुक वर हि पोस्ट Raj Kumar Kasia नावाच्या यूजर ने शेअर केली होती, त्यांचे सोशल सकॅनिंग केल्यावर आम्हाला समजले कि यूजर नोएडा चे रहिवासी आहे.
निष्कर्ष: उत्तर प्रदेश मध्ये मिनी लोकडाऊन नाही लावण्यात येत आहे, व्हायरल पोस्ट मध्ये केलेले दावे चुकीचे आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923