Fact Check: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे व्हायरल चित्र एडिटेड आहे
विश्वास न्युज च्या तपासात व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे दोन वेग-वेगळे छायाचित्र एडिट करून तयार केले गेले आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Jul 10, 2021 at 03:57 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे एक एडिटेड छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री राम मंदिराची रचना अंबानींना सादर करत असल्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची तपासणी केली. आम्हाला समजले की दोन भिन्न चित्रांचे संपादन करून बनावट पोस्ट तयार केली गेली आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हँडल अरमान पठाण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे बनावट चित्र पोस्ट केले असून असा दावा केला आहे: ‘पहली बात ऐ के राम मंदिर का बनना लगभग नामुमकिन है क्यों के उस जमीन के नीचे रेत बालू है..! दूसरी बात ये की अगर कभी बन भी गई तो वो मंदिर कम अम्बानी का होटल जायद होगा. माफी चाहता हूँ पर वो सिर्फ एक कमाई का जरिया होगा पूंजीपतियों के लिए..!’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने प्रथम व्हायरल दाव्याच्या आधारे गुगलमध्ये संबंधित कीवर्ड शोधण्यास सुरवात केली. आम्हाला व्हायरल छायाचित्राचे समर्थन करणारे कोणतेही वृत्त सापडले नाही. यानंतर आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे चित्र स्कॅन करण्यास सुरवात केली. काळजीपूर्वक पाहिल्यावर असे आढळले की योगी आदित्यनाथ यांच्या कुर्ताच्या उजव्या बाजूला खिशा आहे, सहसा कुर्त्याच्या डाव्याबाजूला खिसा असतो. त्याचप्रमाणे, मुकेश अंबानी यांच्या केशरचनेकडे पाहिल्यावर असे कळले कि त्यांनी डाव्या बाजूला भांग काढला आहे, जेव्हा कि ते नेहमी उजव्या बाजूला काढतात. हे स्पष्ट होते कि या छायाचित्राला क्लिप केले होते.
तपासाच्या वेळी आम्हाला मुकेश अंबानी यांचे ओरिजिनल छायाचित्र गुजरात नावाच्या एका वेबसाईट वर होते. सप्टेंबर 2016 रोजी प्रकाशित एका बातमीत सांगितले गेले कि, गांधीनगर च्या एका युनिव्हर्सिटी च्या दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी गेले होते. हे छायाचित्र तेव्हाचे आहे. याला इथे बघू शकता.
याच प्रमाणे आम्हाला योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र त्यांच्याच ट्विटर हॅन्डल वर मिळाले. 8 जानेवारी 2018 रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये त्यांनी सांगितले होते कि हे छायाचित्र नेपाळ चे पूर्व नरेश ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह यांच्या भेटीच्या वेळचे आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने रिलायंस इंडस्ट्री च्या प्रवक्ता सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे.
आता आम्ही व्हायरल पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि अरमान पठाण यांच्या अकाउंट ला नऊ हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. या अकाउंट ला २०२० मध्ये बनवले गेले होते.
निष्कर्ष: विश्वास न्युज च्या तपासात व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे दोन वेग-वेगळे छायाचित्र एडिट करून तयार केले गेले आहे.
- Claim Review : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांचे व्हायरल चित्र
- Claimed By : ट्विटर हैंडल अरमान पठान
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.