Fact Check: बिहार निवडणुकांमध्ये मारपीट च्या नावावर होत आहे दोन वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात बिहार च्या भाजप नेत्यांच्या पिटाई च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा ठरला. हा व्हिडिओ जवळपास दोन वर्ष जुना आहे जो आता बिहार च्या नावावर व्हायरल होत आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 17, 2020 at 03:32 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीला खूप लोकं मारत असताना दिसत होते. सोशल मीडिया वर यूजर्स दावा करत आहे कि हा व्हिडिओ बिहार निवडणुकांचा आहे. हा दावा करण्यात येत आहे कि हिंदू आणि मुसलमान यांच्यात द्वेष निर्माण झाल्या कारणाने वाद हुन मारहाण करण्यात आली.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असताना असे कळले कि हि व्हायरल पोस्ट खोटी आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपासून इंटरनेट वर आहे. या व्हिडिओचा बिहार निवडणुकांसोबत काहीच संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शाहील अली यांनी ६ नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला, ‘#बिहार में कल वोटिंग से ठीक पहले #हिन्दू -मुस्लिम की नफ़रत फैला रहे #भाजपा नेताओं और #कार्यकर्ताओं की (हिन्दू और मुस्लिम भाईयों ने मिलकर जूता से पीटा।“
अर्थात: बिहार मध्ये काल वोटिंग च्या आधी हिंदू आणि मुसलमान यांच्यात द्वेष फैलावणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मिळून मारहाण केली.
या व्हिडिओ ला खरे मानून बरेच यूजर्स शेअर करत आहेत. फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेला व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड केला. यातून आम्हाला बरेच स्क्रीन ग्रेब्स मिळाले. या स्क्रीन ग्रेब्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले. त्यात आम्हाला असाच जुना आणि जास्ती वेळचा व्हिडिओ युट्युब वर मिळाला. Shamshudin Shamshu नावाच्या चॅनेल वर हा व्हिडिओ १७ एप्रिल २०१८ रोजी अपलोड केला गेला होता.
व्हिडिओ ला निरखून बघितल्यावर आम्हाला, काही दुकानांचे नावं बंगाली मध्ये लिहले असल्याचे दिसले. याचा अर्थ स्पष्ट होता कि हा बिहार चा नाही तर बंगाल चा व्हिडिओ होता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दैनिक जागरण चे पश्चिम बंगाल चे ब्युरो चीफ, जे के वाजपेयी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा बंगाल चा जुना व्हिडिओ आहे. याची बरोबर लोकेशन सांगणे शक्य होणार नाही.
शेवटी आम्ही, सोशल मीडिया वर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या त्या व्यक्तीचे सोशल स्कँनिंग केले. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर शाहिल अली हे युपी च्या उरई चे रहिवासी आहे. त्यांच्यावर एका विशिष्ट राजनैतिक दल चा प्रभाव आहे. ते सोशल मीडिया वर खूप सक्रिय आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बिहार च्या भाजप नेत्यांच्या पिटाई च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा ठरला. हा व्हिडिओ जवळपास दोन वर्ष जुना आहे जो आता बिहार च्या नावावर व्हायरल होत आहे.
- Claim Review : #बिहार में कल वोटिंग से ठीक पहले #हिन्दू -मुस्लिम की नफ़रत फैला रहे #भाजपा नेताओं और #कार्यकर्ताओं की (हिन्दू और मुस्लिम भाईयों ने मिलकर जूता से पीटा
- Claimed By : Shahil Ali
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.