Fact Check: पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर व्हायरल झाला फेक ट्विट
पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट फेक आहे. त्यांनी हा ट्विट केला नाही.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 15, 2021 at 01:18 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहेत कि भाजप विरुद्ध हा ट्विट यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यशवंत सिन्हा यांच्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट फेक आज. त्यांनी असा कुठलाच ट्विट केला नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सुरेंद्र बैरवा यांनी ६ मार्च रोजी एक ट्विट चा स्क्रीनशॉट शेअर केला, त्यात यशवंत सिन्हा यांचे छायाचित्र देखील होते. सोबत लिहले होते: ‘प्यार देने से बेटा बिगड़े! भेद देने से नारी! लोभ देने से नोकर बिगड़े! धोका देने से यारी! नोटबन्दी से किसान GST से व्यापारी! और भाजपा को वोट देने से देश बिगड़े! ये बात जनहित में जारी!! धन्यवाद’
यूजर्स हा खोटा ट्विट केंद्रीय मंत्री यांनी केला असल्याचे समजून व्हायरल करत आहेत. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी @YashwantSinhaa नावाचे ट्विटर हॅन्डल शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला कळले कि या नावाचे कुठेलच ट्विटर हॅन्डल अस्तित्वात नाही.
सर्च च्या वेळी आम्हाला यशवंत सिन्हा यांचे खरे ट्विटर हॅन्डल, @YashwantSinha हा मिळाला. यात सिन्हा या आडनावात एक ए आहे, जेव्हाकी खोट्या पोस्ट मध्ये २ ए चा वापर केला गेला आहे. या शिवाय पूर्व केंद्रीय मंत्री यांचे ट्विटर हॅन्डल वेरिफाइड आहे आणि म्हणून त्याच्यासमोर ब्लु टिक आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने यशवंत सिन्हा यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबत व्हायरल ट्विट शेअर केली. त्यांनी सांगितले कि हा ट्विट फेक आहे. माझ्या हॅन्डल समोर ब्लु टिक आज आणि ट्विट मध्ये माझ्या आडनावाचे स्पेल्लिंग देखील चुकीचे आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर सुरेंद्र बैरवा यांचे अकाउंट तपासले. त्यात आम्हाला कळले कि यूजर एका विशिष्ट विचारधारा पासून प्रभावित आहे. त्यांचे ४७ मित्र आहेत.
निष्कर्ष: पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट फेक आहे. त्यांनी हा ट्विट केला नाही.
- Claim Review : यशवंत सिन्हा यांचे व्हायरल ट्विट
- Claimed By : सुरेंद्र बैरवा
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.