Fact Check: हरवलेल्या न्युक्लेअर बम चा वापर करून व्यक्तीने घरातील वीज निर्मित केल्याचा दावा खोटा
विश्वास न्यूजने तपासात ही बातमी खोटी असल्याचे कळले. हा एक उपहासात्मक (सटायर) लेख आहे. पण फेसबुकवर हि एक बातमी म्हणून व्हायरल केले जात आहे, जे चुकीचे आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Apr 20, 2022 at 11:33 PM
नवी दिल्ली (विश्वास टीम): सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीला हरवलेला अणुबॉम्ब सापडला आणि या व्यक्तीने त्याचा वापर आपल्या घरासाठी वीज निर्माण करण्यासाठी केला. त्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली. विश्वास न्यूजच्या तपासात ही बातमी खोटी असल्याचे कळले. हा एक उपहासात्मक लेख आहे. पण फेसबुकवर हा सटायर एक बातमी म्हणून व्हायरल केले जात आहे, जे चुकीचे आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल होत असलेल्या फोटो मध्ये एक न्यूज क्लिप लागली आहे, फोटो च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले आहे: “A man in Florida was arrested for using a lost nuclear bomb to power his home.”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आमचा तपास सुरु करत, आम्ही प्रथम CNN वेबसाइटवर या स्क्रीनशॉटमधील मथळा शोधले. सीएनएनच्या वेबसाइटवर आम्हाला ही बातमी सापडली नाही.
आम्ही गूगल कीवर्ड शोधाचा वापर केला. पण कोणत्याही प्रसिद्ध आणि विश्वासाच्या न्यूज वेबसाईटवर अशी बातमी सापडली नाही. ही बातमी काही स्थानिक वेबसाइट्सवर नक्कीच होती परंतु त्या सर्वांमध्ये या घटनेचा कोणताही तपशील नव्हता. केवळ व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हवाला देण्यात आला.
व्हायरल पोस्टमध्ये दिलेल्या स्कूबा डायव्हरच्या चित्रावर कीवर्डसह रिव्हर्स इमेज सर्चवर आम्हाला worldnewsdailyreport.com वर एक बातमी मिळाली. बातम्यांनुसार “अनुवादित: जॉर्जिया: हौशी डायव्हरला दीर्घकाळ हरवलेले अण्वस्त्र सापडले.” worldnewsdailyreport.com चा शोध घेताना आम्हाला कळले की ही एक सटायर वेबसाइट आहे, जिथे व्यंगावर आधारित लेख लिहिले जातात. वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार, “वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट त्याच्या लेखांच्या व्यंग्यात्मक स्वरूपासाठी आणि त्यांच्या सामग्रीच्या काल्पनिक स्वरूपासाठी सर्व जबाबदारी स्वीकारतो. या वेबसाइटवरील लेखांमध्ये दिसणारी सर्व पात्रे – अगदी वास्तविक लोकांवर आधारित असलेली – पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि त्यांच्यात आणि जिवंत, मृत किंवा मृत व्यक्ती यांच्यातील कोणतेही साम्य हा निव्वळ योगा योग आहे.”
15.01.2014 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात या स्कूबा डायव्हरचे चित्र प्रथम वापरले गेले.
गुगल रिव्हर्स इमेजसह व्हायरल पोस्टमधील पहिली इमेज तपासल्यानंतर, आम्हाला ही इमेज theguardian.com वरील एका बातमीत आढळली. वृत्तानुसार, फोटोमधील माणूस टॉड वॉर्नकेन आहे, ज्याने 2016 च्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात अल्बानी, न्यूयॉर्कमधील एका किराणा दुकानाबाहेर एका कृष्णवर्णीय महिलेला मारहाण करण्याची आणि वांशिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती. महिला टॅक्सीची वाट पाहत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “ट्रम्प जिंकणार आहे आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता” अशी घोषणा होती. त्याने तिला असेही सांगितले: “तुम्हाला [वांशिक अत्याचार करणार्यांना] तुमचा वेळ होता. तुम्हाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.” 55 वर्षीय वॉर्नकेनला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर बलात्कार आणि छळाचा आरोप करण्यात आला.
याबाबत आम्ही सीएनएनशी मेलद्वारे संपर्क साधला आहे. तिथून उत्तर येताच बातमी अपडेट केली जाईल.
Al Simmon’s Gun Shop नावाच्या युजरने ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. फेसबुकवर त्याचे 2,900 फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात ही बातमी खोटी असल्याचे कळले. हा एक उपहासात्मक (सटायर) लेख आहे. पण फेसबुकवर हि एक बातमी म्हणून व्हायरल केले जात आहे, जे चुकीचे आहे.
- Claim Review : A man in Florida was arrested for using a lost nuclear bomb to power his home
- Claimed By : Al Simmon's Gun Shop
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.