X
X

Fact Check: कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मुकेश अंबानी यांचे व्हायरल छायाचित्र ३ वर्ष जुने आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलेले छायाचित्र हे ऑक्टोबर २०१७ मधले आहे आणि या छायाचित्राचा आताच्या शेतकरी आंदोलनासोबत काहीच संबंध नाही आहे.

  • By: Bhagwant Singh
  • Published: Dec 11, 2020 at 03:04 PM
  • Updated: Dec 21, 2020 at 11:19 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात पंजाब चे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि रिलायन्स चे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सोबत हाथ मिळवताना दिसतात. छायाचित्रात दावा करण्यात येत आहे कि शेतकऱ्यांच्या भारत बंद च्या एक दिवस आधी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुकेश अंबानी यांच्यासोबत मुलाखत केली. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्र ३ वर्ष जुने आहे. सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंध या छायाचित्राचा काही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Bhindi Bazaar ने ७ डिसेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मुकेश अंबानी यांचे एक छायाचित्र शेअर केले आणि त्यात कॅप्शन मध्ये लिहले: Bandh se ek din pehle, aaj MUMBAI main Mukesh Ambani ki Punjab ke CM Capt. Amrinder Singh se mulaqat hui, Farmers agitation per Capt. Saheb pehle hi HM Amit Shah ki proposals ka support kar chuke hain. Punjab CM ne kaha keh Ambani ji se un ki Punjab main Industrial aur Investment projects per baat cheet hui. Ek taraf CONGRESS Farmers Agitation aur Bharat Bandh ka support ka r rehi hai aur isi period main Punjab ke CM ji bhi AMBANI JI se mulaqat kar rehe hain, Yeh Kaisi Politics Hai?

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
तपासाची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये हे छायाचित्र अपलोड करण्यापासून केली. सर्च मध्ये मिळालेल्या निकालांमधून आम्हाला स्पष्ट कळले कि हे छायाचित्र सध्याचे नसून तीन वर्षं जुने आहे. आम्हाला हे छायाचित्र कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर अपलोड केलेले मिळाले, हे छायाचित्र ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी शेअर करून त्यांनी लिहले होते, “Happy to meet Mukesh Ambani Ji in Mumbai. Hope to discuss various investment and industrial development opportunities for Punjab.

ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मुकेश अंबानी यांच्या भेटीवरून दैनिक जागरण ची बातमी तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्य्यात आम्ही सर्च केले कि शेतकऱ्यांच्या भारत बंद च्या आधी मुकेश अंबानी हे मुकेश अंबानी यांना भेटले होते कि नाही. आम्हाला त्यांच्या भेटीसोबत संबंधित कुठलीच बातमी इंटरनेट वर मिळाली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही व्हायरल दाव्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंह चे मीडिया सालाहकर विमल सांगली यांच्यासोबत संपर्क केला.विमल ने विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगितले, “हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. हे छायाचित्र आताचे नाही, जुने आहे.

व्हायरल पोस्ट शेअर करणारे फेसबुक पेज Bhindi Bazaar ला ५५६,०७८ लोकं फोल्लो करतात. हा पेज ३१ ऑगस्ट २०१२ रोजी बनवला गेला होता. इंट्रो प्रमाणे हा पेज एक मीडिया वेबसाईट चा पेज आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलेले छायाचित्र हे ऑक्टोबर २०१७ मधले आहे आणि या छायाचित्राचा आताच्या शेतकरी आंदोलनासोबत काहीच संबंध नाही आहे.

  • Claim Review : कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मुकेश अंबानी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आधीचे
  • Claimed By : Bhindi Bazaar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later