हॉस्पिटल मध्ये हिंसा दर्शवणारे हे छायाचित्र जुने आहे, याचा कोविड वॅक्सिनेशन सोबत काही संबंध नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, दावा केला जात आहे कि हे छायाचित्र कोविड-19 व्हॅक्सिनेशन च्या नंतर एका दवाखान्यात झालेल्या हिंसेचा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. दवाखान्यात झालेल्या हिंसेचे व्हायरल छायाचित्र जुने आहे आणि याचा कोविड-19 व्हॅक्सिनेशन सोबत काहीच संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर शेअर करण्यात येत असलेले छायाचित्र एका ब्रेकिंग न्यूज रिपोर्ट चे स्क्रिनशॉट असल्याचे दिसतात. छायाचित्रात टेक्स्ट मध्ये लिहले आहे, “पहले कोविड वैक्सीन पेशेंट्स ने एक दूसरे को खाना शुरू कर दिया, अस्पतालों में लॉकडाउन।” या पोस्ट सोबत कॅप्शन मध्ये लिहले गेले आहे कि २०२१ अजूनच भीतीदायक दिसत आहे.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज च्या मदतीने शोधले. आम्हाला हे छायाचित्र १४ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू यॉर्क टाइम्स मध्ये एका रिपोर्ट मध्ये प्रकाशित झाल्याचे दिसले.
या रिपोर्ट च्या एका भागात लिहले होते, “टेंपल यूनिवर्सिटी दवाखान्यात मागच्या वर्षी गोळीबार मध्ये जखमी झालेल्या ४८१ रुग्णांचे उपचार केले आणि ९७ ची मृत्यू झाली, एका शहराच्या, एका भागाच्या, एका दवाखान्यातली हि घटना आहे. पूर्ण देशात २०१७ मध्ये बंदुकांच्या गोळीबारात जवळपास ४०,००० लोकांचा जीव गेला. हे छायाचित्र तुम्हाला सांगण्यासाठी आहे कि काय काय झाले आहे.”
या छायाचित्रासोबत कॅप्शन दिले गेले आहे, “मदतकार्यानंतर प्रयत्न सफल ना झाल्यानंतर टेंपल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या विभागाचा ट्रॉमा वाला भाग.”
फेब्रुवारी २०१९ मध्ये कोविड किंवा कोविड वॅक्सीन ची काही चर्चा नव्हती, जसे व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात आले.
आम्हाला हे छायाचित्र एका प्रॅन्क वेबसाईट वर पण मिळाले, ज्यावर लिहलेल्या टेक्स्ट मध्ये कोविड वॅक्सीन बद्दल सांगितले गेले आहे.
आम्ही व्हायरल दाव्याला इंटरनेट वर शोधले, पण अशी कुठलीच अधिकृत न्यूज रिपोर्ट आम्हाला मिळाली नाही, जी कोविड वॅक्सीन सोबत जुडलेल्या दाव्याची पुष्टी करेल.
आम्ही या व्हायरल दाव्या संबंधित अपोलो हॉस्पिटल च्या पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर निखिल यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले, “कोविड वॅक्सीन ने आतापर्यंत असा कुठलाच साईड इफेक्ट झाला नाही आहे. व्हायरल पोस्ट कोविड वॅक्सिनेशन सोबत संबंधित नाही आहे.”
या पोस्ट ला फेसबुक वर Stiffler Mc-hunter Aggabao Balisi नावाच्या यूजर ने शेअर केले आहे. आम्ही या यूजर च्या प्रोफाइल ला स्कॅन केले. फॅक्ट चेक करण्यात येत पर्यंत या प्रोफाइल चे ४३४ फोल्लोवर्स होते.
निष्कर्ष: हॉस्पिटल मध्ये हिंसा दर्शवणारे हे छायाचित्र जुने आहे, याचा कोविड वॅक्सिनेशन सोबत काही संबंध नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923