Fact Check: हे चित्र रुसी सैनिकांचे आहे, सियाचीन मधील भारतीय सैनिकांचे नाही
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र भारतातील नाही तर रुस मधील सैनिकांचे आहे, जे आता चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Dec 28, 2021 at 03:49 PM
- Updated: Dec 28, 2021 at 03:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सध्या सोशल मीडियावर दोन जवानांचा एक फोटो व्हायरल होत आहे. छायाचित्रात दोन्ही सैनिक बर्फाने झाकलेले दिसत आहेत. व्हायरल झालेला फोटो सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांचा असल्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल झालेला फोटो भारतीय नाही तर रशियन सैनिकांचा आहे. जो आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक Indian Army lovers यूजर ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: सियाचिन ग्लेशियर में भारतीय सैनिकों की रात की तस्वीर
तपास:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे इमेज शोधली. या दरम्यान आम्हाला 21 डिसेंबर 2013 रोजी रशियन स्टॉक इमेज वेबसाइट vk.com वर अपलोड केलेले व्हायरल चित्र सापडले. इथेही व्हायरल झालेल्या फोटोला फक्त रशियाचाच सांगण्यात आले आहे. वेबसाइटनुसार, चित्रात रशियन सैनिकांचे कठोर प्रशिक्षण दिसत आहे. आम्हाला हे चित्र इतर अनेक रशियन वेबसाइटवर देखील आढळले.
अधिक माहितीसाठी, आम्ही दैनिक जागरणसाठी डिफेन्स स्टोरी कव्हर करणारे पत्रकार संजय मिश्रा ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हे चित्र भारतीय सैनिकांचे नाही. याच दाव्यासह अनेक वर्षांपासून हा व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय सैनिक दुर्गम ठिकाणी मायनस डिग्री तापमानात सेवा देत आहेत हे खरे आहे, पण हे चित्र त्यांचे नाही.
व्हायरल झालेले चित्र जुने असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल झालेल्या चित्राची घटना किती जुनी आहे, याची खात्री विश्वास न्यूजने स्वतंत्रपणे केली नाही. पण हे निश्चित आहे की इंटरनेटवर मार्च 2013 पासून रशियन सैनिकांचे चित्र उपस्थित आहे. त्याचा भारतीय लष्कराशी काहीही संबंध नाही.
तपासाअंती, आम्ही फेसबुक यूजरचे सोशल स्कॅनिंग केले ज्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की फेसबुकवर 9 हजारांहून अधिक लोक यूजर ला फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र भारतातील नाही तर रुस मधील सैनिकांचे आहे, जे आता चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे.
- Claim Review : सियाचिन में तैनात भारतीय सैनिकों की तस्वीर
- Claimed By : Indian Army Lovers
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.