नवी दिल्ली (विश्वास न्यूज). मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या रणधुमाळीत, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कमलनाथ यांना कथितपणे सरकारमध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकले जाऊ शकते. दावा केला जात आहे की, निवडणुकीपूर्वीच शिवराज सिंह चौहान यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात ही व्हायरल क्लिप बनावट आणि ऑल्टर्ड असल्याचे आढळून आले, जिला निवडणूकीत चुकीच्या प्रचाराच्या उद्देशाने शेअर केले जात आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिप ऑल्टर्ड आहे, जिच्यात शिवराजसिंह चौहान यांच्या आवाजात फसवे आणि बनावट विधान जोडण्यात आले आहे. ज्या व्हिडिओमध्ये ऑडिओ जोडण्यात आला आहे तो भोपाळमधील सातपुडा भवनला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीचा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घटनेची आढावा बैठक घेतली होती.
सोशल मीडिया वापरकर्ता ‘rajchouhan_iyc’ ने व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करताना लिहिले आहे की, “शिवराजने पराभव स्वीकारला, बोलले आम्ही ₹ 1250 देत होतो… कमलनाथ ₹ 1500 देणार आहेत. आम्ही स्वयंपाकाचा गॅस 450 रुपयांना देण्याचे खोटे आश्वासन देत होतो, पण ते प्रत्यक्षात 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार आहेत. ते इतर राज्यांतही देत आहेत.”
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ त्याच आणि मिळत्या-जुळत्या दाव्यासह शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एएनआय या न्यूज एजेंसीचा लोगो आहे आणि त्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री असे म्हणताना ऐकू येत आहेत की, “…मी वारंवार म्हणतोय की कमलनाथ यांना थांबवावे. काँग्रेस सत्तेवर आल्यास प्रत्येकाला महिन्याला 1500 रुपये आणि गॅस 500 रुपयांत गॅस द्यायला सुरुवात करेल. ही वेळ सोडा, पुढच्या वेळीही जिंकणे आम्हाला अशक्य होईल. आम्ही काही लोकांना 1250 रुपये दिले आहेत… ते सर्वांना देतील. आम्ही गॅस सिलिंडर 450 रुपयांना देण्याचे आमिष दाखवले आहे, ते तर खरोखर देणार आहेत, करण ते राज्यांत देत आहेत. भाऊ, तुम्ही काहीही करा, पण कमलनाथना थांबवा.”
हा व्हिडिओ पाहून ही बाब स्पष्ट होते की, यात डबिंगच्या मदतीने शिवराजसिंग चौहान यांच्या आवाजात एक बनावट विधान जोडले गेले आहे. आम्ही व्हायरल क्लिपचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी रिव्हर्स – इमेजने त्याच्या कीफ्रेम शोधल्या.
13 जून 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर हा व्हिडिओ सापडला. अहवालानुसार, ही बैठक सातपुडा भवन येथे लागलेल्या आगीनंतर झालेल्या आढावा बैठकीची आहे, ज्यात मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.
आम्हाला हा व्हिडिओ एएनआय न्यूज एजन्सीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही सापडला, जो चार महिन्यांपूर्वी अशाच संदर्भात शेअर करण्यात आला होता. देण्यात आलेल्या माहितीनुसार, सातपुडा भवनातील आगीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला होता.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा व्हिडिओ भोपाळच्या एक्स हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ते त्याच अधिकाऱ्यां आणि मंत्र्यांसोबत व्हायरल क्लिप दिसून येणारी बैठक घेताना दिसत आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या या भेटीचा उल्लेख इतर अनेक वाहिन्यांच्या न्यूज रिपोर्टमध्ये केला गेला आहे.
आम्ही नईदुनियाच्या राज्य ब्युरोचे प्रमुख धनंजय प्रताप सिंह यांच्याशी या व्हायरल व्हिडिओबाबत संपर्क साधला. त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, “हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा आवाज वेगळा जोडण्यात आला आहे.” मंत्रालयात झालेल्या एका जुन्या बैठकीचा हा व्हिडिओ असल्याचे त्यांनी सांगितले.
या बनावट व्हिडिओला शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे इन्स्टाग्रामवर सुमारे चारशेहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतर खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या निवडणूकसंबंधित दाव्यांची तपासणी करणारे फॅक्ट चेक अहवाल, विश्वास न्यूज वेबसाइटवर वाचता येतील.
निष्कर्ष: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकारला सत्तेत न येऊ देण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा व्हिडिओ संपादित आणि ऑल्टर्ड आहे. मूळ व्हिडिओ भोपाल स्थित सतपुरा भवनात लागलेल्या आगी नंतरच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीचा है, त्यांनी या घटनेचा आढावा घेऊन तिच्या तपासणीचे निर्देश दिले होते. त्यांच्या याच व्हिडीओला संपादित करून कमलनाथ यांना सरकारमध्ये येण्यापासून रोखण्याच्या संदर्भात बनावट विधान जोडून निवडणूकीत चुकीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने शेअर केले जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923