वृत्तपत्राचे कात्रण ज्यात सांगितले गेले आहे कि ४००० संघ कार्यकर्त्यांना अटक केली, जे १९७१ चे असल्याचे सांगण्यात येत आहे, ते कात्रण डिजिटल टूल्स च्या मदतीने बनवण्यात आले आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला नुकतेच एक वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडिया वर व्हायरल होताना आढळले. या कात्रणाच्या हेडलाईन मध्ये इंग्रजीत लिहले होते, “4000 RSS workers arrested”. कात्रणात दिलेल्या माहिती प्रमाणे, हि बातमी रविवार ३० ऑगस्ट, १९७१ ची आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल वृत्तपत्राच्या कात्रणांचा तपास केला आणि त्यात हे खोटे असल्याचे समजले. डिजिटल टूल्स वापरून हे कात्रण बनवण्यात आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला Faiz_Save_India @Faiz_INC यांचे एक ट्विट दिसले, व्हायरल होत असलेले कात्रण शेअर करून त्यांनी लिहले होते, “Is this what they were doing to free Bangladesh?“
या कात्रणात दिलेले मजकूर खालील प्रमाणे, “Yesterday while protesting for the liberation of Bangladesh before the parliament house,a group of enthusiastic RSS workers were arrested under the stringent provisions of IPC section 377. While protesting, the RSS workers were performing unnatural sexual acts which threatened law and order situation in the capital. Lead by an enthusiastic Gujarati Lad, they were raising slogans against section 377 too.“
अर्थात: काल संसद भवनासमोर बांगलादेश मुक्तीसाठी आंदोलन करीत असताना आरएसएस कार्यकर्त्यांच्या एका गटाला आयपीसी कलम 7 377 च्या कठोर तरतुदीनुसार अटक केली गेली. निषेध व्यक्त करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अप्राकृतिक लैंगिक कृत्य करीत होते ज्यामुळे राजधानीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती धोक्यात आली होती. उत्साही गुजराती यांच्या नेतृत्वात ते कलम 7 377 च्या विरोधातही घोषणा देत होते.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
कात्रणात देण्यात आलेल्या काही गोष्टींमुळे विश्वास न्यूज ला व्हायरल होत असलेल्या या कात्रणांचा संशयीत आला. न्यूजपेपर च्या मास्टहेड मध्ये पेपर चं नाव संपूर्णतः दिसत नाही. या पेपर मध्ये दिवस आणि तारीख सांगण्यात आली आहे, रविवार दिनांक, ३० ऑगस्ट १९७१. जेव्हाकी ३० ऑगस्ट १९७१, हा सोमवार होता. तसेच या बातमीत बाईलाईन आणि डेटलाईन देखील दृष्टीस पडत नाही.
आता आम्हाला हे कळले होते कि हि बातमी नक्कीच कुठल्याच वृत्तपत्रात आली नव्हती. आम्हाला वाटले कि हि डिजिटल पद्धतीने बनवण्यात आली असावी. म्हणून आम्ही सर्च इंजिन मध्ये काही कीवर्डस टाकले, ‘newspaper clipping maker online’.
त्यात आम्हाला एक वेबसाईट मिळाली ज्याचा मजकूर तुम्ही खाली बघू शकता.
या वेबसाईट वर दाखवण्यात आलेला स्निपेट हा व्हायरल होत असलेल्या कात्रणापासून खूपच मिळता जुळता होता.
यातल्या समानता खाली बघा.
आम्ही सामान्य कीवर्ड सर्च वापरून हे शोधण्याचा प्रयत्न केला कि खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या कार्यकर्त्यांना १९७१ साली अटक झाली होती का, तर त्या सर्च मध्ये आम्हाला, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये २७ मार्च २०२१ रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली. या बातमीत ऑगस्ट १२, १९७१ रोजी प्रकाशित त्यांचा आर्काइव्ह या वृत्तपत्राने पब्लिश केला होता. या बातमीचे शीर्षक होते, “PM’s Satyagraha talk in Dhaka sparks online war”. या आर्काइव्ह चे शीर्षक होते, “10,000 Jana Sangh men court arrest in Delhi”
या बातमीत सांगितले गेले आहे, “१०,००० पेक्षा जास्ती जन संघ कार्यकर्त्यांना, ज्यात १२०० स्त्रिया आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे त्यांना रेकग्नाईस बांगला देश सत्याग्रह च्या १२व्या आणि शेवटच्या दिवशी” अटक करण्यात आली.
हि न्यूजपेपर क्लिप खाली बघा:
सगळ्यात शेवटी विश्वास न्यूज ने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख, नरेंदर कुमार यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले, “व्हायरल होत असलेले वृत्तपत्राचे खोटे आहे. संघ ला बदनाम करण्याच्या हेतूने हे कात्रण व्हायरल करण्यात आले आहे.
शेवटी विश्वास न्यूज ने त्या यूजर चा सोशल बॅकग्राऊंड चेक केला ज्यांनी हि पोस्ट शेअर केली, Faiz_Save_India @Faiz_INC यांना ८९५२ लोकं फॉलो करतात. ते सप्टेंबर २०१४ पासून ट्विटर वर आहे. त्यांनी आपल्या इंट्रो मध्ये लिहले आहे, “Support Congress to Save India from Criminals. BJP, RSS, MIM & AAP supporters – kindly stay away.”
अस्वीकरणः कथेत काही लहान भाषा आणि माहिती बदल घडवून आणल्या आहेत ज्याचा कथेच्या निष्कर्षावर काही परिणाम होत नाही.
निष्कर्ष: वृत्तपत्राचे कात्रण ज्यात सांगितले गेले आहे कि ४००० संघ कार्यकर्त्यांना अटक केली, जे १९७१ चे असल्याचे सांगण्यात येत आहे, ते कात्रण डिजिटल टूल्स च्या मदतीने बनवण्यात आले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923