X
X

Fact Check: स्पेशल इफेक्ट्स वापरून तयार केलेला व्हिडिओ राजस्थान च्या लाईट शो चा सांगून व्हायरल

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हिडिओ जोधपूर मध्ये होणाऱ्या लाईट शो चा नाही आहे, पण एका चीन च्या आर्टिस्ट द्वारे बनवल्या गेलेल्या स्पेशल इफेक्ट्स चा संग्रह आहे.

  • By: Pallavi Mishra
  • Published: Jan 10, 2021 at 02:02 PM
  • Updated: Jul 1, 2022 at 11:57 AM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आर्टिस्टिक प्रकारे बनवलेले ऍनिमेटेड क्लिप्स चा एकित्रिकरण बघता येतं. या पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा जोधपूर मध्ये होणाऱ्या लाईट शो चा व्हिडिओ आहे. पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि या शो ला बघण्यासाठी ३००० रुपये चे तिकीट आहे.

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हिडिओ जोधपूर मध्ये होणाऱ्या लाईट शो चा नाही आहे, पण एका चीन च्या आर्टिस्ट द्वारे बनवल्या गेलेल्या स्पेशल इफेक्ट्स चा संग्रह आहे.

काय होत आहे व्हायरल?


व्हायरल पोस्ट मध्ये आर्टिस्टिक रित्या बनवल्या गेलेल्या अनलिमिटेड क्लिप्स चे संकलन बघता येते. या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे, “Beautiful LIGHT SHOW In Jodhpur (Rajasthan State) Entrance fee is Rs.3,000 per head. Now, enjoy this colourful night show for free.”

या पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:


आम्ही सगळ्यात आधी InVID टूल ची मदत घेऊन व्हायरल व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब्स काढले. या कीफ्रेम्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड केले आम्हाला या प्रकारचे दृश्य वाले व्हिडिओ, ixigua वेबसाइट वर लॉन्ग यिचेन या नावाच्या यूजर च्या अधिकृत चॅनेल वर मिळाले. व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेल्या व्हिडिओ च्या छटा या व्हिडिओ संग्रहात बघायला मिळाले. प्रोफाइल प्रमाणे, लॉन्ग यिचेन चीन हे एक स्पेशल इफेक्ट्स निर्माते आहेत.

थोडे अजून शोधल्यावर आम्हाला लॉन्ग यिचेन या चॅनेल वर अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला, ज्यात व्हायरल व्हिडिओ मधले पहिले दहा सेकंड्स दिसतात.




अजून खात्री करून घेण्यासाठी आम्ही राजस्थान च्या जोधपूर मध्ये राहणारे टूरिज्म एक्सपर्ट संजय कौशिक यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “हा व्हिडिओ जोधपूर चा नाही आहे. इथे असा कोणताच शो होत नाही.”

आम्ही या विषयी जागरण च्या राजस्थान रिपोर्टर नरेंद्र शर्मा यांच्यासोबत देखील संपर्क केला, त्यांनी देखील सांगितले कि हा व्हिडिओ राजस्थान चा नाही आहे.

या पोस्ट ला सोशल मीडिया वर बऱ्याच लोकांनी चुकीच्या दाव्यांसोबत शेअर केले आहे. असाच एक व्हिडिओ ‘Dinesh Kumar Gupta’ नावाच्या फेसबुक यूजर ने शेअर केला आहे. यूजर चे फेसबुक वर 1,368 फोल्लोर्स आहेत. यूजर मध्य प्रदेश च्या जबलपूर चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा दावा खरा नाही. हा व्हिडिओ जोधपूर मध्ये होणाऱ्या कोणत्या लाईट शो चा नाही पण एका आर्टिस्ट ने बनवलेल्या एका स्पेशल इफेक्ट्स च्या व्हिडिओ चा आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हिडिओ जोधपूर मध्ये होणाऱ्या लाईट शो चा नाही आहे, पण एका चीन च्या आर्टिस्ट द्वारे बनवल्या गेलेल्या स्पेशल इफेक्ट्स चा संग्रह आहे.

  • Claim Review : Beautiful LIGHT SHOW In Jodhpur (Rajasthan State) Entrance fee is Rs.3,000 per head. Now, enjoy this colourful night show for free.
  • Claimed By : Dinesh Kumar Gupta
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later