Fact Check: कोरोनाव्हायरस आणि इतर कारणांमुळे झालेल्या मृत्यावर २ लाख मिळणार असा दावा करणारी पोस्ट खोटी आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना च्या अंतर्गत कोणत्या पण प्रकारे झालेल्या मृत्यू च्या स्तिथीत पॉलिसी धारकाला बिमा कव्हर मिळतो. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) हि फक्त कुठल्या प्रकारचा अपघात झाल्यास पोलीस धारकाला कव्हर देते. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल मेसेज मध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा आढळला.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि कॉरोन किंवा अन्य कुठल्या कारणांनी मृत्यू झाल्यास PMJJBY किंवा PMSBY मध्ये क्लेम केल्यास मृतक व्यक्तीच्या नातेवाईकांना २ लाख रुपये मिळतील. विश्वास न्यूज ला आपल्या चैटबॉट (+91 95992 99372) वर देखील हा दावा फॅक्ट-चेक करता मिळाला. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट दिशाभूल करणारी ठरली.

काय होत आहे व्हायरल?
कॉरोन किंवा कुठल्या पण कारणांनी मृत्यू झाल्यास बिमाच्या स्वरूपात २ लाख रुपये मिळतील, असा दावा फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सऐप वर व्हायरल होत आहे. सी० एल० सारस्वत नावाच्या एका ट्विटर यूजर ने हा दावा शेअर केला. या ट्विट मध्ये लिहले आहे, “महत्वपूर्ण सूचना.. यदि किसी करीबी, रिश्तेदार, या परिचित के परिवार में हाल ही में कोई मृत्यु हुई हो। चाहे वह किसी भी कारण, बीमारी या कोविड -19 से हो गई हो, तो उनके बैंक से खाता विवरण देखने को कहें। यदि पासबुक की प्रविष्टि में (01-04 से 31-03) 12/- या रु 330/- काटा गया हो तो इसे चिह्नित करें और मृतक के परिजनों से कहें कि बैंक में जाकर दो लाख रुपए के लिए बीमा राशि का दावा प्रस्तुत करें। आप सभी से विनम्र आग्रह है कि यदि आपके आसपास ऐसी घटना हुई हो तो तुरंत पीड़ित परिवार अथवा उनके परिजनों को अवश्य सूचित करें। वर्ष 2015 में, भारत सरकार ने सभी बैंकों के बचत खाताधारकों को दो सस्ती बीमा योजनाएं प्रदान की थी। प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) 330/- रुपये में और प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा बीमा योजना (PMSBY) 12/- में। हममें से अधिकांश लोगों ने इस फॉर्म को भरा था। जिसका वार्षिक प्रीमियम हमारे बचत खाते से प्रतिवर्ष कटता है। इस संदेश को प्रसारित करने में सहयोग करें। हो सकता है कि आपके इस प्रयास से किसी परिवार को दो लाख रुपयों की मदद मिल जाए।

या ट्विट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
या व्हायरल दाव्यात प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा बीमा योजना (PMSBY) यांचा उल्लेख केला गेला आहे. दावा करण्यात येत आहे कि या दोन्ही बिमा योजनांच्या अंतर्गत २ लाख इतकी रकम मिळेल. विश्वास न्यूज ने क्रमशः सगळ्यात आधी या दोन्ही योजनांबद्दल इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाची अधिकृत वेबसाइट वर प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) या योजनेबद्दल माहिती मिळाली. त्यांच्यानुसार , हि जीवन बिमा योजना १८ से ५० वयवर्ष या गटासाठी आहे, जी बँकांच्या खात्यामध्ये बिमा राशी ऑटो डेबिट व्हायची अनुमती देते. या बिमाची अवधी १ जून ते ३१ मे इतकी आहे. २ लाख रुपये चा बिमा यात कव्हर होईल, जो कुठल्या पण बिमा धारकाच्या मृत्यू नंतर त्याच्या (नॉमिनी) नातेवाईकांना मिळेल. या शासकीय पोर्टल प्रमाणे, ३१ मे ला किंवा त्याच्या आधी ऑटो डेबिट झाल्यानंतर खात्यात ३३० रुपये इतका प्रीमियम कटेल तेव्हाच हा बिमा प्रभावी राहील. हि संपूर्ण माहिती इथे क्लिक करून वाचा.

त्याच प्रमाणे आम्हाला या पोर्टल वर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) (ज्याला व्हायरल क्लेम मध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा बीमा योजना म्हंटले जात आहे) त्या बद्दल देखील सांगितल्या गेले आहे. त्या प्रमाणे, हा बिमा कव्हर वर्षाला १२ रुपये प्रीमियम वर १८ ते ७० आयु वर्ग च्या लोकांसाठी आहे. या बिमा धर्मकाची ऍक्सिडेंटल मृत्यू किंवा पूर्ण विकलांगांच्या स्तिथी मध्ये २ लाख रुपये आणि आंशिक विकलांगता आल्यास एक लाख रुपये इतके मिळतात. या बद्दल पण संपूर्ण माहिती तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता.

व्हायरल क्लेम मध्ये दावा करण्यात येत आहे, कि या दोन्ही बिमा च्या आधारावर कोरोनाव्हायरस किंवा अन्य कुठल्या कारणामुळे मृत्यू झाल्यास २ लाख रुपये क्लेम केले जाऊ शकतात. जेव्हाकी, भारत सरकार च्या वेबसाईट वर दिल्या प्रमाणे, PMSBY फक्त ऍक्सीडेन्ट झाल्यास बिमा कव्हर देते.
या संबंधी अधिक माहिती साठी, विश्वास न्यूज ने ऑप्टिमा मनी मैनेजर्स प्राइवेट लिमिटेड चे एमडी आणि सीईओ पंकज मथपाल, यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले, PMJJBY कुठल्यापण प्रकारे मृत्यू झाल्यास त्याच्या धारकाला बिमा कव्हर देते, तसेच PMSBY फक्त दुर्घटना झालेल्या घटनांसाठी आहे.
पंकज मथपाल यांच्या प्रमाणे, अश्यात हा दावा कारण चुकीचे आहे, कि कोविड किंवा कोणत्यापण प्रकारे मृत्यू झाल्यास PMSBY धारकाला २ लाख रुपये मिळतात.
विश्वास न्यूज ने हा व्हायरल दावा ट्विट करणारे यूजर सी० एल० सारस्वत यांच्या प्रोफाइल ला स्कॅन केले. हि प्रोफाइल जुलै २०२० रुपजी बनवली गेली आहे. फॅक्ट-चेक करेपर्यंत या प्रोफाइल ला, २१३८ लोकं फोल्लो करत होते.

निष्कर्ष: प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना च्या अंतर्गत कोणत्या पण प्रकारे झालेल्या मृत्यू च्या स्तिथीत पॉलिसी धारकाला बिमा कव्हर मिळतो. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) हि फक्त कुठल्या प्रकारचा अपघात झाल्यास पोलीस धारकाला कव्हर देते. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल मेसेज मध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा आढळला.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट