Fact Check: सपाच्या समर्थकांनी नाही बनवले हे गाणे, खोटा दावा व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचा समजले. हा व्हिडिओ क्रॉप करून खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल 29 सेकंड ची क्लिप 6 मिनिटाच्या गाण्याच्या एका व्हिडिओ मधून घेण्यात आले आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Nov 23, 2021 at 02:32 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): 29 सेकंदाच्या गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2022 मध्ये होणाऱ्या यूपी निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला तर हिंदूंना बाजूला ठेवून संपूर्ण राज्य मुस्लिम समाजाच्या ताब्यात जाईल, असे ह्या गाण्यात सांगितले जात आहे. गाण्याचा हा व्हिडिओ शेअर करून, समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी हे गाणे मुस्लिम समुदायाने बनवले असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले. हा व्हिडिओ भाजप समर्थकाने बनवला आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडिओ शेअर करत फेसबुक यूजर प्रमोद भदाना यांनी लिहिले की, “मुस्लिम समुदाय द्वारा बनाया गया ये गाना हिन्दुओ की ऑख खोलने के लिए पर्याप्त है। इससे हम देख सकते है कि उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की क्या सोच है। फिर भी कुछ मूर्ख हिन्दू जाति के नाम पर यूपी में सपा की सरकार बनने का सपना देख रहे हैं।”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
दाव्याचा तपास आम्ही गूगल रिव्हर्स इमेजसर्च सोबत केला. ह्या फ्रेम च्या मुख्य फ्रेम्स चा वापर आम्ही त्यासाठी केला. या दरम्यान, आम्हाला Rudra Music नावाच्या युट्युब चॅनेलवर व्हायरल व्हिडिओ सापडला. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गाण्याचे कलाकार संदीप आर्य यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर, आम्हाला कळले की ओरिजिनल व्हिडिओची क्लिप केलेली आवृत्ती सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. व्हायरल व्हिडिओचे मध्ये ह्या गाण्याचे बोल 40 सेकंदानंतर आढळते.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही हे गाणे बनवणाऱ्या संदीप आचार्य ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “मी भाजप समर्थक आहे आणि हे गाणे मी लिहले आहे. हे गाणे मी जवळपास एक वर्ष आधी योगी सरकार साठी बनवले होते. हे गाणे आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
शेवटी आम्ही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर प्रमोद भड़ाना ह्यांच्या अकाउंट चा तपास केला. त्यात कळले कि हा प्रोफाइल 2009 मे मध्ये बनवण्यात आला होता. यूजर चे 178 फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचा समजले. हा व्हिडिओ क्रॉप करून खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल 29 सेकंड ची क्लिप 6 मिनिटाच्या गाण्याच्या एका व्हिडिओ मधून घेण्यात आले आहे.
- Claim Review : मुस्लिम समुदाय द्वारा बनाया गया ये गाना हिन्दुओ की ऑख खोलने के लिए पर्याप्त है। इससे हम देख सकते है कि सपा पार्टी की क्या सोच है। फिर भी कुछ मूर्ख हिन्दू जाति के नाम पर सपा की सरकार बनने का सपना देख रहे हैं।
- Claimed By : प्रमोद भड़ाना
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.