विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. 2020 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मध्य प्रदेशात महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकाने उघडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर वृत्तपत्रातील एक कटिंग शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की विकासाच्या दिशेने वाटचाल करताना मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी मद्याचे स्वतंत्र दुकान उघडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तपत्राच्या कटिंगवर लिहिले आहे, “महिलाओं के लिए अलग से दुकान खोलेगी सरकार. भोपाल, इंदौर, जबलपुर से होगी शुरुआत।” विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. 2020 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मध्य प्रदेशात महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकाने उघडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करत फेसबुक युजर Rajendra Kumar Gupta यांनी लिहिले की, ” विकास के नये सोपान तय करते हुये मध्य प्रदेश की सरकार।”
फेसबुक पोस्टचा मजकूर येथे आहे तसा लिहिला आहे. त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून पाहिली जाऊ शकते.
तपास:
व्हायरल दाव्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही वृत्तपत्रातील कटिंग्ज पाहिल्या. पाहिल्यावर, आम्हाला आढळले की व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये पीपल्स ब्युरो लिहिलेले आहे. कीवर्डसह शोधल्यावर आम्हाला कळले की ही बातमी 28 फेब्रुवारी 2020 रोजी पीपल्स समाचार नावाच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते.
आम्हाला outlookindia.com, indiatimes.com, india.com, oneindia.com वर देखील या प्रकरणाची बातमी मिळाली. सर्व बातम्या फेब्रुवारी, मार्च 2020 च्या आहेत. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि कमलनाथ मुख्यमंत्री होते.
शोध घेत असताना, आम्हाला 28 फेब्रुवारी 2020 रोजी मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे एक ट्विट सापडले, ज्यामध्ये त्यांनी ही बातमी ट्विट करून आपली निराशा व्यक्त केली होती.
अधिक माहितीसाठी, आम्ही भोपाळमधील नयीदुनिया चे राज्य ब्युरो चीफ धनंजय प्रताप सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे. काँग्रेस सरकारमध्ये हा प्रस्ताव आणण्याची चर्चा होती. मात्र शिवराज सरकारने तसा कोणताही प्रस्ताव आणला नाही आणि तसा प्रस्तावही तयार केला जात नाही. मध्य प्रदेशात महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकाने उघडण्यात आलेली नाहीत.”
खोट्या दाव्याने हा स्क्रीनशॉट व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही हा स्क्रीनशॉट चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला होता. त्यादरम्यान आम्ही या दाव्याची चौकशी केली आणि सत्य समोर आणले.
तपासाअंती पोस्ट व्हायरल करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. युजरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये असे आढळून आले की युजर मध्य प्रदेशातील जबलपूर शहरातील रहिवासी आहे. राजेंद्र कुमार गुप्ता यांचे फेसबुकवर 4007 मित्र आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. 2020 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मध्य प्रदेशात महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकाने उघडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923