Fact Check: मंडावा चा शिवलिंग नेपाळ च्या पशुपतीनाथ मंदिर च्या नावाने होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल न्यूज खोटी असल्याचे समजले. जे चित्र काठमांडू च्या पशुपतिनाथ मंदिर चे सांगून व्हायरल होत आहे, ते राजस्थान मधील मंडावा च्या मंदिराचे आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पारदर्शी शिवलिंग चे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. यूजर्स ह्या शिवलिंगाला नेपाळ च्या पशुपतीनाथ मंदिर चे सांगून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात कळले कि या चित्राचा नेपाळ सोबत काहीच संबंध नाही. हे चित्र राजस्थान च्या मंडावा मध्ये असलेल्या मंदिरातील शिवलिंगाचे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर संजय सूर्यवंशी ने 14 ऑगस्ट रोजी एक पोस्ट अपलोड केली. ह्यात एका शिवलिंगाचे चित्र दिसत होते आणि सोबत दावा करण्यात आला होता: ‘ये फोटो श्री पशुपति नाथ जी काठमांडू का है जो की नेपाल में है, इस शिवलिंग का फोटो बहुत मुश्किल से उपलब्‍ध हुआ है आप इसे अपने मित्रों को भेजे ताकि वो भी दर्शन का लाभ ले सके।’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे, ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज ची मदत घेतली. सुरुवातीला आम्हाला फेसबुक पेज आणि युट्युब व्हिडिओ वरून माहिती मिळाली कि हे चित्र नेपाळ चे नाही तर, राजस्थान मधील मंडावा मधील एका कसब्यातील शिव मंदिरातील आहे.
गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या मदतीने आमहाला एक फेसबुक पेज देखील मिळाला, ज्याचे नाव होते Mandawa-पारदर्शी शिव मंदिर. त्या पेज वर डीपी मध्ये तेच छायाचित्र वापरले गेले होते जे आता नेपाळ च्या नावावर व्हायरल होत आहे.

ह्या फेसबुक पेज वर आम्हाला एक लोकल वृत्तपत्रातील बातमी मिळाली. ह्यात संगीतले गेले होते कि मंडावा च्या वॉर्ड 18 मधील एका मंदिरात पारदर्शी शिवलिंग आहे. हि बातमी इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही फेसबुक पेज वर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क केला. मोबाईल नंबर यूजर दीपेश ने सांगितले कि नेपाळ च्या पशुपतीनाथ मांडीत च्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट फेक आहे. हे शिवलिंग छायाचित्र मंडावा चे आहे. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

तपासावेळी आम्हाला एक युट्युब चॅनेल मिळाला, ज्यावर 5 डिसेंबर 2020 रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता. ह्यात पारदर्शी शिवलिंग मंदिर बद्दल सांगितले गेले होते. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

आता आम्हाला हे जाणून घयायचे होते कि पशुपतिनाथ मंदिर चा शिवलिंग कसा दिसतो. एबीपी न्यूज च्या एका व्हिडिओ द्वारे आम्हाला कळले कि बागमती नदी च्या काठी हे मंदिर आहे. इथे भगवान शिवाचे चार मुख आहे. पूर्ण व्हिडिओ इथे खाली बघा.

आता आम्ही त्या यूजर चा तपास केला ज्याने मंडावा चे चित्र नेपाळ च्या नावाने व्हायरल केले, आम्हला कळले कि फेसबुक यूजर संजय सूर्यवंशी महाराष्‍ट्र च्या नाशिक चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल न्यूज खोटी असल्याचे समजले. जे चित्र काठमांडू च्या पशुपतिनाथ मंदिर चे सांगून व्हायरल होत आहे, ते राजस्थान मधील मंडावा च्या मंदिराचे आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट