Fact check: पवारांनी नाही म्हंटले कि त्यांना पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा शपथ घेतांना पाहायचय, व्हायरल दावा चुकीचा
शरद पवारांनी नाही म्हंटले कि त्यांना पंतप्रधान मोदींना तिसर्यांदा शपथ घेतांना पाहायचे आहे. त्यांचे एक हास्यास्पद विधान खरे समजून होत आहे व्हायरल.
- By: Ankita Deshkar
- Published: Dec 7, 2022 at 05:39 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात येत असल्याचा दिसत आहे. दाव्यात असे म्हंटले गेले आहे कि पवारसाहेबांना म्हणजेच शरद पवारांना, नरेंद्र मोदी ह्यांना तिसऱ्यांदा शपत घेताना बघायचे आहे. विश्वास न्यूज ने दाव्याचा तपास केले असता असे लक्षात आले कि व्हायरल दावा खोटा आहे. एनसीपी नेते शरद पवार ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची स्तुती नक्की केली पण असे म्हंटले नाही कि पवारांना मोदी ह्यांना तिसऱ्यांदा शपत घेताना बघायचे आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Yogesh Malekar ह्यांनी एक कोटी भाजपा समर्थक ह्या फेसबुक ग्रुप वर एक पोस्ट केली. पोस्ट मध्ये लिहले होते: पंतप्रधान मोदींना तिसर्यांदा शपथ घेतांना मला माझ्या डोळ्यांनी पाहायचय- पवारसाहेब
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने शरद पवार ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्दल कुठले वक्तव्य केले, हे जाणून घेण्यापासून केले.
आम्हाला द हिंदू च्या वेबसाईट वर एक बातमी सापडली. बातमीत म्हंटले होते, “शरद पवारांनी मोदींचे कौतुक केले, पंतप्रधानांची प्रशासनावर चांगली पकड आहे”
आम्हाला रिपब्लिक भारत वर देखील एक बातमी सापडली. ह्या बातमीत म्हंटले होते: पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या सकारात्मक राजकारणाचे कौतुक केले, काँग्रेस नेत्यांना त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले
किवर्ड सर्च करून देखील आम्हाला कुठलीच अशी बातमी नाही सापडली ज्यात म्हंटले होते कि, “पंतप्रधान मोदींना तिसर्यांदा शपथ घेतांना मला माझ्या डोळ्यांनी पाहायचय असे पवार ह्यांनी म्हंटले”.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही, राष्ट्रवादी चे नेते जगदीश पंचबुधे ह्यांना संपर्क केला. ते म्हणाले, “हे शरद पवार ह्यांचे हास्यास्पद विनोद असून, भाजप २०२४ मध्ये आपणच सत्तेत असणार व नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान असणार असे फुगे फुगवत आहे आणि जनतेला भ्रमित करत आहे. शरद पवार साहेबांचे हे हास्यास्पद विनोद आहे, जे २०२४ साली पूर्ण होणार नाही.”
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, आम्ही Yogesh Malekar ह्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. त्यात कळले कि ते २००९ पासून फेसबुक वर सक्रिय आहेत.
निष्कर्ष: शरद पवारांनी नाही म्हंटले कि त्यांना पंतप्रधान मोदींना तिसर्यांदा शपथ घेतांना पाहायचे आहे. त्यांचे एक हास्यास्पद विधान खरे समजून होत आहे व्हायरल.
- Claim Review : मोदी ह्यांना तिसऱ्यांदा शपथ घेताना पाहायचे आहे असे शरद पवार म्हणाले
- Claimed By : Yogesh Malekar
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.