Fact Check: बचपन का प्यार गाणाऱ्या सहदेव ला नाही मिळाली २३ लाखांची कार, खोटी बातमी होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात सहदेव ला 23 लाख ची कार मिळाल्याचा दावा खोटा ठरला.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): ‘बचपन का प्‍यार’ गाणं म्हणून संपूर्ण इंटरनेट ला वेड लावणारा छत्‍तीसगढ़ च्या सुकमा चा सहदेव, या लहान मुलाबद्दल एक खोटी बातमी सध्या व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि सहदेव ला २३ लाखांची चार चाकी भेट म्हणून एका शोरूम च्या मालकाने दिली. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात कळले कि हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचा आमच्या तपासात समजले. सहदेव ला रायपूर मध्ये एक कार च्या शोरूम मध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते आणि त्यांना ग्राहकाला चाबी देण्यास सांगितले होते.

काय होत आहे व्हायरल?
Muzaffarpur Wow नावाच्या फेसबुक यूजर ने बातमी ची लिंक शेअर करून लिहले: ‘बचपन का प्यार गाने वाले सहदेव को गिफ्ट में मिली 23 लाख की MG की कार, इंटरनेट पर मचा दिया था धमाल।’

ह्या पोस्ट ला खरे समजून बाकी लोकं देखील ह्याला शेअर करत आहेत. फेसबुक पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
लिंक मध्ये असलेल्या बातमीच्या मजकुरात असे लिहले होते कि ‘MG के शो रूम के मालिक ने खुश होकर उन्हें 23 लाख रुपए की MG हेक्टर SUV गिफ्ट में दी है।’

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या दाव्याचा तपास सुरु केला आणि सगळ्यात आधी गूगल सर्च केले.संबन्धित किवर्ड वापरून सर्च केल्यास आम्हाला नईदुनिया वेबसाईट वर एक बातमी सापडली. यात सांगितले गेले कि सहदेव ला कुठलीच कार भेट म्हणून देण्यात आली नाही. हा दावा खोटा आहे. हि बातमी इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने नईदुनिया सुकमा चे ब्‍यूरो चीफ सतीश चाणक्‍य यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि सहदेव वरून बऱ्याच सोशल मीडिया साईट्स वर खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. एका कार्यक्रमासाठी कार शोरूम च्या मालकाने सहदेव यांना बोलावले होते. त्याच वेळी काही लोकांनी एक व्हिडिओ काढला आणि खोट्या दाव्यासह व्हायरल केला.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही थेट सहदेव आणि पिंटू मानिकपुरी यांना देखील संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला संपूर्ण माहिती देत सांगितले कि सहदेव ला २३ लाखांची कार मिळाली हि माहिती पूर्णतः खोटी आहे. 9 ऑगस्ट ला रायपूर येथे एमजी मोटर्स कडून सहदेव ला बोलावले होते. त्यांनी तिथे एका कस्टमर ला त्यांच्या हातून गाडीची चाबी प्रदान केली.

पिंटू ने विश्वास न्यूज ला त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील पाठवला जो तुम्ही इथे बघू शकता.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चा देखील तपास केला. त्यात कळले कि फेसबुक पेज Muzaffarpur Wow या वॉर मुझ्झरफारपूर संबंधी जास्ती कन्टेन्ट अपलोड करण्यात येते. या पेज ला 2.60 लाख पेक्षा जास्ती लोकं लाईक करतात आणि हा पेज 14 मार्च 2017 रोजी बनवला गेला आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात सहदेव ला 23 लाख ची कार मिळाल्याचा दावा खोटा ठरला.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट