Fact Check: सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याच्या दाव्यांसह एडिटेड छायाचित्र होत आहे व्हायरल

काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची बातमी खोटी आहे. या दाव्यांसह व्हायरल होत असलेले छायाचित्र एडिटेड आहे.

नवी दिल्ली (विश्वास टीम): राजस्थान काँग्रेस मध्ये सत्तासंघर्ष चालू आहेच, काँग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील काढले, त्यानंतर एक छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे. त्या छायाचित्रात असा दावा केला आहे कि सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. छायाचित्रात भाजप चे अध्यक्ष जे पी नड्डा, सचिन पायलट यांना फुलांचा पुष्पगुच्छ देताना दिसतात.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. जे पी नड्डा आणि सचिन पायलट यांचे छायाचित्र खोटे आहे, एका जुन्या छयाचित्राला एडिट करून हे बनवण्यात आले आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर ‘Rajesh Neel’ ने व्हायरल छायाचित्र (आर्काइव लिंक) ला शेअर करून लिहले, “Congratulations join BJP 💐💐#Sachin_pilot
Join BJP

https://twitter.com/Rajesh30neel/status/1282563130074075136

फेसबुक वर अन्य यूजर ने याच छायाचित्राला सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असे मानून फेसबुक वर शेअर केले आहे.

तपास:

व्हायरल पोस्ट मध्ये एका छायाचित्राचा उपयोग करण्यात आला आहे. गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून आम्हाला खरे छायाचित्र आढळले, ज्याला सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला या दाव्यांसह शेअर केले जात होते.

वास्तवात हे छायाचित्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जेव्हा भाजप मध्ये प्रवेश केला तेव्हाचे आहे. NDTV.com वर ११ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्ट मध्ये या छायाचित्राचा वापर केला गेला आहे.

त्या बातमीत दिलेल्या माहिती प्रमाणे, सिंधिया यांनी काँग्रेस मधून राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला. या छायाचित्रात सिंधिया यांचा चेहरा एडिट करून तिथे सचिन पायलट यांचे छायाचित्र वापरून चुकीच्या दाव्यांसह व्हायरल केले गेले आहे.

हिंदी न्यूज चॅनल ‘आज तक’ च्या यू-ट्यूब चॅनलवर ११ मार्च रोजी अपलोड केलेल्या एका विडिओ बुलेटिन मध्ये पण या छायाचित्राचा वापर गेला गेला आहे.

दैनिक जागरणच्या वेबसाइटवरच्या एका बातमी प्रमाणे, १४ जुलै रोजी प्रकाशित केल्या गेलेल्या एका बातमी प्रमाणे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्याची बातमी आम्हाला आढळली.
काँग्रेस च्या कारवाई नंतर सचिन पायलट यांनी आपल्या राजकीय भविष्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही. काँग्रेस सत्ता संघर्षानंतर सचिन पायलट यांनी आपल्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वरून ट्विट केले होते, त्यानंतर त्यांनी १८ जुलै एक ट्विट केला ज्यात त्यांनी आसाम आणि बिहार च्या पुरामुळे प्रभावित लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.

सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आम्हाला कुठेही बातमी सापडली नाही. त्यानंतर विश्वास न्युज ने भाजप चे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी विश्वास न्युज ला सांगितले कि सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही.

निष्कर्ष: काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची बातमी खोटी आहे. या दाव्यांसह व्हायरल होत असलेले छायाचित्र एडिटेड आहे.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट