Fact Check: रुस ने भारताला चेतावनी दिली नाही, सीएनएन चा एडिटेड स्क्रीनशॉट होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि भारताबद्दल रुस किंवा पुतीन ने वक्तव्य केले नाही, सीएनएन चे व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे.

Fact Check: रुस ने भारताला चेतावनी दिली नाही, सीएनएन चा एडिटेड स्क्रीनशॉट होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): युक्रेन आणि रुस च्या युद्धात रोज काही ना काही नवीन घटना बघायला मिळत आहे. नुकतेच एका भारतीय विद्यार्थ्याने देखील आपला जीव रुस च्या हल्ल्यात गमावला. अश्यातच विश्वास न्यूज ला अशी एक पोस्ट सापडली ज्यात लिहले आहे कि पुतीन ने भारताला युद्धात ढवळा-ढवळ करण्यास सक्त मनाई केली आहे, अन्यथा ह्याचे परिणाम वाईट होतील असे सांगितले आहे. हे सगळे सीएनएन च्या प्लेट वर लिहण्यात आले आहे. आमच्या तपासात हा व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर सियासी गलियारा ने हाच स्क्रीनशॉट पोस्ट केला, ज्यात असे दिसत होते कि हा सीएनएन चा विडिओ चा स्क्रीनशॉट असावा. त्या फ्रेम वर लिहले होते: Putin’s new punchline, India should not interfere, otherwise be ready to face the consequences.

युसर ने सोबत दावा करून पोस्ट सोबत लिहले होते: रूस की भारत को भी कड़ी चेतावनी
रूस के राष्ट्रपति ने धमकी देते हुए कहा बीच मे आया तो अंजाम भुगतने को तैयार रहे भारत

हे चित्र आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात हे चित्र गूगल लेन्स द्वारे शोधण्यास सुरुवात केली.

आम्हाला लगेच https://edition.cnn.com/ ह्या वेबसाईट वर एक व्हिडिओ सापडला, ज्यावर तेच पुतीन चे चित्र होते जे व्हायरल छायाचित्रात दिसत होते.

ह्या व्हिडिओ सोबत वेबसाईट वर लिहले होते:

Russian interference in U.S. elections now comedy fodder for Kremlin
The Lead

CNN’s Frederik Pleitgen reports.
Source: CNN

हा तोच व्हिडिओ होता ज्याचा स्क्रीनशॉट तश्याच लेआऊट सोबत व्हायरल होत होता:
पण स्क्रीन वर लिहले होते: PUTIN’S NEW PUNCHLINE: TOP RUSSIAN OFFICIAL JOKES ABOUT INTERFERING IN U.S. ELECTIONS IN 2020

भाषांतर: पुतिनची नवीन पंचलाइन: 2020 मधील यूएस निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू, रुस च्या अधिकारी चे वक्तव्य.

त्या नंतर विश्वास न्यूज ने कीवर्ड सर्च द्वारे हे शोधले कि भारताबद्दल व्हायरल वक्तव्य केले आहे का. आम्हाला कुठल्याही अधिकृत वेबसाईट वर हि बातमी सापडली नाही.

आता हे स्पष्ट होते कि पुतीन ने असे वक्तव्य केले नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने सीएनएन च्या हेड ऑफ स्ट्रॅटेजिक कॉम्म्युनिकेशन, मॅट डॉर्निक ला संपर्क केला. ते म्हणाले, “होय. ते एडिटेड आहे. वास्तविक प्रसारणाच्या स्क्रीनशॉटवर चुकीच्या फॉन्टमध्ये हे बनावट फॉन्ट वापरले गेले आहे. CNN ने ती कथा कधीही प्रकाशित केली नाही किंवा प्रसारित केली नाही.”

विश्वास न्यूज ने यूजर चे बॅकग्राऊंड चेक केले, आम्हाला कळले कि सियासी गलियारा @THEPOLITICALGALLERY ला 56,208 लोकांनी लाईक केले आहे तसेच एक लाख पेक्षा जास्ती यूजर फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि भारताबद्दल रुस किंवा पुतीन ने वक्तव्य केले नाही, सीएनएन चे व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट