Fact Check: ‘पीएम रामबाण योजना’ अंतर्गत रु 4000 मिळत आहे, असा दावा करणारी व्हायरल पोस्ट खोटी आहे

मेसेज आणि पोस्ट ज्यात दावा केला आहे कि युवकांना ‘प्रधानमंत्री रामबाण योजना’ अंतर्गत चार हजार रुपये मिळतील, असा दावा करणारी पोस्ट खोटी आहे. सरकार ची अशी कुठलीच स्कीम नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होताना दिसली. ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि युवकांना ‘प्रधान मंत्री रामबाण सुरक्षा योजना’ अंतर्गत चार हजार रुपये रजिस्टर केल्यावर मिळत आहे. हे मेसेजस व्हाट्सअँप वर देखील व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rajan Kumar Sajan ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या चित्राचे एक बॅनर शेअर केले, ज्यात सांगितले होते कि मोफत सुरक्षेकरिता सरकार ने प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना सुरु केली आहे.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

दुसरे फेसबुक यूजर Vishal Kanoojiya Vishal Kanoojiya ने देखील एका व्हाट्सअँप फॉरवर्ड चा स्क्रीनशॉट आपल्या प्रोफाइल वर अपलोड केला आणि हिंदी मधील ह्या मेसेज वर लिहला होते, प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना चे रजिस्ट्रेशन सुरु आहे आणि भारतातील युवकांना त्या अंतर्गत चार हजार रुपये मिळणार आहे.
ह्या मेसेज सोबत एक लिंक देखील होती.
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

सगळ्या पोस्ट्स सोबत एक लिंक व्हायरल होत आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल मेसेज सोबत असलेल्या लिंक चा तपास केला.

(विश्वास न्यूज आपल्या वाचकांना सांगू इच्छितो कि अश्या कुठल्याच संशयास्पद लिंक वर क्लीक करू नये)

ह्या लिंक वर प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेचा रेजिस्ट्रेशन फॉर्म आम्हाला दिसला.
आम्ही त्यावर क्लीक केल्यावर, UPI APP विचारण्यात आला आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर विचारण्यात आला.

कुठल्यापण सरकारी योजेनेकरता अप्लाय करण्याकरिता कॉन्टॅक्ट नंबर ची गरज नसून विविध डॉक्युमेंट्स चि गरज असते.

त्यानंतर आम्ही सरकारी पोर्टल च्या ‘स्कीम्स’ सेक्शन चा तपास केला.

आम्ही किवर्डस वापरून ती, ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ कुठे या पोर्टल वर सापडते का बघितले, पण आम्हाला हि स्कीम कुठेच दिसली नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने नागपूर चे, आत्मनिर्भर भारत अभियान प्रमुख, अमेय विश्वरूप ह्यांना संपर्क केला. त्यांनी देखील सांगितले कि ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ नावाची कुठलीच योजना नाही. सरकारी योजनेच्या नावाखाली हा एक स्कॅम आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट शेअर करणारे यूजर, Vishal Kanoojiya Vishal Kanoojiya ह्यांचा तपास केला. ते खालिलाबाद चे रहिवासी आहे.


निष्कर्ष: मेसेज आणि पोस्ट ज्यात दावा केला आहे कि युवकांना ‘प्रधानमंत्री रामबाण योजना’ अंतर्गत चार हजार रुपये मिळतील, असा दावा करणारी पोस्ट खोटी आहे. सरकार ची अशी कुठलीच स्कीम नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट