Fact Check: रिहाना ने नाही केले कंगना वरून हे ट्विट, व्हायरल पोस्ट खोटी आहे

रिहाना ने कंगनाच्या टीकेवरून कुठलेच ट्विट केले नाही. व्हायरल होत असलेली ट्विट एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवण्यात आले आहे.

Fact Check: रिहाना ने नाही केले कंगना वरून हे ट्विट, व्हायरल पोस्ट खोटी आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि हा हा ट्विट हाॅलीवुडच्या गायिका रिहाना यांनी केले आहे, ज्यात लिहले आहे कि कंगना यांच्या सारख्या महिला त्यांच्या प्रोग्रॅम मध्ये डान्स करतात.

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा तसेच व्हायरल ट्विट खोटी असल्याचे समजले. रिहाना ने हा ट्विट केला नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर  Satnam Singh Khalsa ने हि पोस्ट शेअर केली, ज्यात लिहले होते:  कंगना जैसी औरते मेरे प्रोग्राम मे डांस करती है वो भी सस्ते भाव मे – Rihanna
अर्थात: कंगना सारख्या महिला माझ्या प्रोग्रॅम मध्ये डान्स करतात, ते पण कमी किमतीत – Rihanna

व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी इंटरनेट वर बातम्या शोधून केली. कीवर्डस च्या मदतीने आम्ही ट्विट बद्दल शोधले, पण आम्हाला अशी कुठलीच मीडिया रिपोर्ट मिळाली नाही. त्या विपरीत आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स अश्या मिळाल्या ज्यात असे सांगितले गेले आहे कि कंगना रानौत यांनी रिहाना यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिल्या नंतर त्यांच्यावर टीका केली. जर का रिहाना यांनी कंगना च्या टीकेवर काही उत्तर दिले असते तर त्याबद्दल मीडिया मध्ये बातम्या नक्की असत्या.

आम्ही रिहाना च्या अधिकृत ट्विटर अकाउंट चा देखील तपास केला, पण आम्हाला तिथे देखील असे कुठलेच ट्विट मिळाले नाही जिथे रिहाना यांनी कंगना वर टीका केली असेल.
आम्ही हा व्हायरल ट्विट लक्षपूर्वक वाचला असता असे लक्षात आले कि हा ट्विट हिंदी मध्ये आहे आणि यात बऱ्याच चुका आहे. रिहाना हॉलिवूड अभिनेत्री आहेत आणि असे शक्य नाही कि त्या हिंदीत ट्विट करतील. त्याशिवाय या ट्विटसोबत ट्विट चे तारीख आणि वेळ स्पष्ट केलेले नाही. जेव्हा पण कुठले ट्विट केले जाते, त्या यूजर च्या ट्विट समोर तारीख आणि वेळ स्पष्ट दिलेली असते. त्यामुळे असे स्पष्ट होते कि हा ट्विट एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवला गेला आहे.

अधिक माहिती साठी आम्ही मुंबई च्या दैनिक जागरण च्या एंटरटेनमेंट बीट सांभाळत असलेल्या स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि रिहाना च्या ट्विटर हॅन्डल वर असे कुठलेच ट्विट नाही आणि व्हायरल होत असलेले ट्विट हे एडिटिंग टूल च्या मदतीने बनवण्यात आले आहे.

आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर Satnam Singh Khalsa यांच्या बद्दल अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही यूजर ची प्रोफाइल स्कॅन केली तर आम्हाला असे कळले कि यूजर अंबाला, हरियाणा चे रहिवासी आहे आणि बातमी लिहण्यात येत पर्यंत त्यांचे ८९९ फोल्लोवेर्स होते.


निष्कर्ष: रिहाना ने कंगनाच्या टीकेवरून कुठलेच ट्विट केले नाही. व्हायरल होत असलेली ट्विट एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवण्यात आले आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट