Fact Check: सुखरूप आहेत रिटायर्ड मेजर जनरल बक्षी, कोरोनाव्हायरस ने मृत्यू झाल्याच्या अफवा व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. जनरल जि डी बक्षी हे सुखरूप आहेत आणि ते गुरुग्राम मध्ये राहतात.
- By: Amanpreet Kaur
- Published: May 10, 2021 at 09:02 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात रिटायर्ड मेजर जनरल गगनदीप बक्षी यांचे छायाचित्र शेअर करून दावा करण्यात येत आहे कि त्यांचा कोरोनाव्हायरस ने मृत्यू झाला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. मेजर जनरल जी डी बक्षी हे सुखरूप गुरुग्राम मध्ये असल्याचे आमच्या तपासात समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Om Prakash Jakhar ने हे छायाचित्र शेअर करून कॅप्शन लिहले: न जाने कोरोनावायरस ने कितनी जिंदगी को तबाह कर दिया रोहित सरदाना के बाद आपका यूं जानादेश के प्रसिद्ध टीवी चैनलों में राष्ट्रवाद के लिए अपनी दमदार आवाज को मुखर करने वाले मेजर जनरल जी.डी. बख्शी जी भी कोरोना से जीवन की जँग हार गये।(चेत मानखां,चेत जमानो चेतण को आयो।)ईश्वर दिवंगत आत्मा को सद्गती प्रदान करे।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्ही सगळ्यात आधी कीवर्ड्स च्या मदतीने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि मीडिया मध्ये खरंच अश्या रिपोर्ट्स आहेत का ज्यात बक्षी यांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असतील. जनरल बक्षी हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत आणि जर त्यांची मृत्यू झाली असती तर या बाबतीत असंख्य बातम्या नक्कीच नेटवर मिळाल्या असत्या. पण आम्हाला कुठेच त्यांना कोरोनाव्हायरस ने ग्रासल्याचे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिसले नाही.
या नंतर आम्ही जनरल बक्षी यांचे सगळे सोशल मीडिया हॅन्डल तपासले, बक्षी यांनी ७ मे रोजी केलेला एक ट्विट आम्हाला मिळाला, ज्यात त्यांनी लिहले होते कि ते सुखरूप आहेत आणि त्यांच्या मृत्यू च्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये.
अधिक माहिती साठी आणि या बाबतीत सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने थेट जनरल बक्षी यांना संपर्क केला. आमचे बक्षी यांच्या सोबत संभाषण झाले. त्यांचे असे म्हणणे आहे कि त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडिया वर या साठी व्हायरल केली जात आहे कारण त्यांनी, कोरोनाव्हायरस हे चीन चे देणं असल्याचे वक्तव्य केले होते.
फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा Om Prakash Jakhar यांच्या प्रोफाइल चा तपास केला. प्रोफाइल स्कॅन केल्यावर असे कळले कि यूजर जोधपूर चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. जनरल जि डी बक्षी हे सुखरूप आहेत आणि ते गुरुग्राम मध्ये राहतात.
- Claim Review : मेजर जनरल जि डी बक्षी यांचे कोरोनाव्हायरसने निधन
- Claimed By : Om Prakash Jakhar
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.