विश्वास न्यूजच्या तपासात रतन टाटा यांचे अल्कोहोल खरेदीचे वक्तव्य खोटे असल्याचे स्पष्ट झाले.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर नेहमीच उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दल खोट्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात , असेच एक वक्तव्य रतन टाटा यांच्या नावावर व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि, रतन टाटा यांनी दारू खरेदी करणाऱ्यांची सरकारी फ़ूड सब्सिडी संपवावी आणि आधार कार्ड द्वारे त्यांनी दारू विक्री करावी असे म्हंटले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. हे एक खोटे वक्तव्य आहे ज्याला रतन टाटा यांच्या नावावर व्हायरल करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘यशपाल अरोरा’ ने व्हायरल पोस्ट शेअर केले, ज्यात रतन टाटा यांचे चित्र आहे आणि इंग्रजीत लिहले: Liquor sales should be sold through Aadhaar card. Government food subsidies should be stopped for alcohol buyers. Those who have the facility to buy alcohol can definitely buy food. When we give them free food they pay and buy alcohol: Ratan Tata.
विश्वास न्यूजच्या तपासात रतन टाटा यांचे अल्कोहोल खरेदीचे वक्तव्य खोटे असल्याचे स्पष्ट झाले.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाची सुरुवात आम्ही गूगल ओपन सर्च द्वारे केली आणि व्हायरल दावा शोधण्यास सुरु केले. सर्च माडेच आम्हाला कुठल्याही अधिकृत वेबसाईट वर रतन टाटा यांचे वक्तव्य मिळाले नाही. रतन टाटा नेहमीच बातम्यांमध्ये असतात, त्यांनी असे कुठले वक्तव्य केले असते तर नक्कीच कुठल्या मीडिया ऑर्गनायझेशन ने त्याला कव्हर केले असते.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही रतन टाटा यांचे, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट सर्च केले, त्यावर देखील आम्हाला असे कुठलेच वक्तव्य मिळाले नाही.
अधिक माहिती साठी आम्ही टाटा समूह चे कॉरपोरेट कम्युनिकेशन पर्सनल बॉब जॉन ह्यांना व्हाट्सअँप द्वारे संपर्क केला. त्यांनी व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले आणि आमच्यासोबत रतन टाटा यांच्या इंस्टाग्राम स्टेटस चे स्क्रीनशॉट शेअर केले, ज्यात व्हायरल पोस्ट फेक असल्याचे सांगितले गेले आहे. हा स्क्रीनशॉट खाली बघा.
आता आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Yash Pal Arora यांचे सोशल स्कॅनिंग केले. आम्हाला कळले कि यूजर पंचकूला चा रहिवासी आहे. त्यांनी हे अकाउंट नोव्हेंबर 2011 मध्ये बनवले होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात रतन टाटा यांचे अल्कोहोल खरेदीचे वक्तव्य खोटे असल्याचे स्पष्ट झाले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923