Fact Check: सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत गजानन महाराज नाहीत, पुरी चे शंकराचार्य आहेत

दुर्मिळ चित्रात सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत, गजानन महाराज नसून पुरी चे शंकराचार्य आणि कर्नल निजामुद्दीन आहे.

Fact Check: सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत गजानन महाराज नाहीत, पुरी चे शंकराचार्य आहेत

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसले, ज्यात दावा करण्यात येत होते कि सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत शेगाव चे गजानन महाराज आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. चित्रात बोस यांच्यासोबत पुरी चे शंकराचार्य आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Dinesh Rambhia ने एक छायाचित्र पोस्ट केले आणि लिहले: श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो
हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे … अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा..
“गण गण गणात बोते “

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. आम्हाला त्यात बरेच रिजल्ट्स मिळाले.

आम्हाला कळले कि हा फोटो आधि पण #IndianHistory @RareHistorical नि ट्विटर वर 5 एप्रिल 2016 रोजी पोस्ट केला होता त्यात सांगितले होते कि सुभाष चंद्र बोस यांचे पुरी चे शंकराचार्य यांच्यासोबत चित्र.

आम्हाला काँग्रेस च्या वेरिफाइड ट्विटर अकाउंट वर देखील हे चित्र मिळाले.

betterphotography.in ह्या वेबसाईट प्रमाणे हे चित्र मनोरंजन घोष ह्यांनी घेतले होते.

आम्ही हे देखील तपासले कि चित्रात दिसत असलेला दुसरा इसम कोण आहे. परत गूगल रिव्हर्स इमेज द्वारे आम्हाला कळले कि दुसरे व्यक्ती हे कर्नल निजामुद्दीन, बोस ह्यांचे ड्राइव्हर आहे, ज्यांनी त्यांना वाचवण्यासाठी बंदुकीच्या तीन गोळ्या खाल्ल्या होत्या.

आता हे नक्की होते कि चित्रात सुभाष चंद्र बोस ह्यांच्या सोबत पुरी चे शंकराचार्य आणि कर्नल निजामुद्दीन आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने सुभाष चंद्र बोस चे अभ्यासक, अंबरीश पुंडलिक ह्यांना संपर्क केला. विश्वास न्यूज ला त्यांनी सांगितले, “गजानन महाराजांची संजीवन समाधी १९१० सालची; तर नेताजींचा जन्म १८९७ चा. या फोटोचं साल आपण उशिरात उशिरा १९१० जरी धरलं तरी नेताजी तेव्हा १३ वर्षाचे असतील- सातवी किंवा आठवीत! वरील फोटोतील गजानन महाराजांसारखी दिसणारी व्यक्ती ही पुरी चे तेव्हाचे शंकराचार्य आहेत.

त्यानंतर विश्वास न्यूज ने त्या फेसबुक यूजर चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि यूजर मुंबई चा रहिवासी आहे आणि ‘आठवणीतली मराठी गाणी’ ज्या ग्रुप मध्ये त्यांनी हि पोस्ट शेअर केली त्याचे साढ़े तीन लाख मेंबर्स आहे.

निष्कर्ष: दुर्मिळ चित्रात सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत, गजानन महाराज नसून पुरी चे शंकराचार्य आणि कर्नल निजामुद्दीन आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट