विश्वास न्यूज च्या तपासात अभिसार शर्मा ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट खोटा आहे. त्यांचे चित्र, नाव आणि हॅन्डल वापरून हा खोटा ट्विट बनवण्यात आला होता.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): यूपीसह देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या असतानाही काही पत्रकारांना खोट्या पोस्टद्वारे लक्ष्य केले जात आहे. ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या नावाने केलेल्या बनावट ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. यामध्ये त्यांचा फोटो आणि नाव वापरून असा दावा केला जात आहे की त्यांनी ४ फेब्रुवारीच्या त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२२ च्या यूपी निवडणुकीत योगी आदित्यनाथ पुन्हा विजयी झाले तर मी नोएडाहून दिल्लीतील शेखसराय येथे शिफ्ट होईल आणि तेथे अंड्याचे आमलेट खाईन. हे लिहून घ्या.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात हि खोटी असल्याचे समजले. अभिसार शर्मा च्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट फेक आज. त्यांनी असा कुठलाच ट्विट केलेला नाही. ह्या आधी, वरिष्ठ पत्रकार, अजित अंजुम ह्यांच्या नावावर देखील असाच ट्विट व्हायरल झाला होता. ह्याचा तपास इथे वाचा.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ए सनातनी ने 11 मार्च रोजी एक पोस्ट शेअर केली आणि लिहले: ‘वैसे तो हम vegeterian हैं, लेकिन इस बात पर बोलना चाहेंगे, “चल बे abhisar, 2 अंडे का ऑमलेट बना…”
ह्या खोट्या स्क्रीनशॉट मध्ये लिहले होते: ‘अगर 2022 यूपी चुनाव में योगी आदित्यनाथ फिर से जीते तो मैं नॉएडा से शिफ्ट होकर दिल्ली के शेखसराय आ जाऊंगा और वहां अंडे औमलेट की रेड़ी लगाऊंगा। लिख कर ले लो।’
फेसबुक पोस्ट आणि त्या ट्विट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास देण्यात आला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. ह्याला खरे समजून बाकी यूजर्स देखील अभिसार शर्मा वर निशाणा साधत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने हा ट्विट आधी व्यवस्थित बघीतला. तो पाहताच आम्हाला लक्षात आले कि हा ट्विट खोटा आहे कारण, फॉन्ट आणि त्याच्या लाईन्स मध्ये बारीच जागा आहे. हि स्पेस ट्विटर वर दिसत नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने अभिसार शर्मा चे ट्विटर हॅन्डल स्कॅन केले. व्हायरल ट्विट मध्ये 11:42 AM आणि 4 Feb 2022 असे सांगितले होते. ह्या माहितीच्या आधारावर आम्ही ट्विट शोधण्यास सुरुवात केली. ट्विटर ऍडव्हान्स टूल च्या माध्यमाने आम्हाला, चार फेब्रुवारी चा ट्विट मिळाला, जो 11:42 AM वाजता करण्यात आला होता. ओरिजिनल ट्विट मध्ये अभिसार शर्मा ने लिहले होते: ‘Happy birthday @RoflGandhi_bhai. Haste rahiye, hasaate rahiye. Hausla buland rakhen aur Noida me Manka kee talaash jaaree rakhen.’
अभिसार शर्मा ह्यांचा ओरिजिनल ट्विट आणि त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेल्या ट्विट चा स्क्रीनशॉट खाली बघा.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्य्यात आम्ही वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि युपी निवडणुकांचे निकाल आल्यावर हा खोटा ट्विट व्हायरल होत आहे. ह्याच्या आधी पुलवामा आणि बिहार निवडणुकांच्या वेळी देखील असा खोटा ट्विट व्हायरल झाला होता. हा ट्विट पूर्णपणे खोटा आहे. लोकं माझ्याबद्दल खोटा प्रचार प्रसार करत आहेत.
तपासाच्या शेवटी विश्वास न्यूज ने फेसबुक पेज ए सनातनी चे सोशल स्कॅनिंग केले. त्यात कळले कि ह्या पेज चे नऊ हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत. हा पेज 26 एप्रिल 2020 रोजी बनवण्यात आला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अभिसार शर्मा ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट खोटा आहे. त्यांचे चित्र, नाव आणि हॅन्डल वापरून हा खोटा ट्विट बनवण्यात आला होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923