Fact Check: आमदार अदिती सिंह 5 आमदारांसह भाजपमध्ये सामील झाल्या नाहीत, व्हायरल पोस्ट खोटी आहे

निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात असे आढळले कि अदिती सिंह आणि त्यांच्या आईचे हे जुने छायाचित्र त्यांनी भाजपात प्रवेश केले अश्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे. या फक्त अफ़वाह आहे. सदर पोस्ट खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज) कॉंग्रेसच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी 5 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याचे खोटे भाष्य आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने या दाव्याची चौकशी केली. आमच्या तपासादरम्यान व्हायरल पोस्टचा दावा खोटा असल्याचे समोर आले. अदिती सिंह आणि त्यांची आई यांचे जुने छायाचित्र चुकीच्या दाव्यांसाठी वापरल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल?


फेसबुक यूजर Narsingh Dixit यांनी २४ मे रोजी एक पोस्ट शेअर केली आणि त्यात असा दावा केला कि, ‘अदिति सिंह कांग्रेस पार्टी छोड़कर 5 विधायकों सहित भाजपा ज्वाइन किया। दिल से अभिनंदन,बहुत-बहुत बधाई हो। भाजपा पार्टी में आपका स्वागत है।’
अर्थात: अदिती सिंह यांनी काँग्रेस पार्टी सोडून, ५ आमदारांसोबत भाजपात
प्रवेश केला , त्यांचं अभिनंदन आणि स्वागत
हाच दावा बरेच लोकं फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप वर पण व्हायरल करत आहेत.

तपास:


विश्‍वास न्‍यूजने सगळयात आधी या व्हायरल छायाचित्राचे सत्य जाणून घेतले. या छायाचित्रात अदिती सिंह यांच्या सोबत दिसणाऱ्या दुसऱ्या महिला कोण हे शोधून काढले. गूगल रिवर्स इमेज टूल वापरले असता, खरे छायाचित्र अदिती सिंह यांच्या ट्विटर हॅन्डल वर आढळले.
१० मे रोजी खऱ्या छायाचित्रासोबत अदिती यांनी दोन अजून छायाचित्र ट्विट केले. त्यात त्यांनी लिहले होते, ‘माँ के बारे में क्या लिखूँ….माँ ने खुद मुझे लिखा है. #मातृ_दिवस के अवसर पर हर माँ को मेरा प्रणाम। I love you Maa..’


म्हणजे व्हायरल झालेल्या या पोस्ट मध्ये छायाचित्रात अदिती यांच्या सोबत त्यांची आई होती हे स्पष्ट झाले आहे. आणि तसेच हे छायाचित्र जुने आहे हे देखील स्पष्ट झाले आहे.


आता आम्ही अदिती सिंह यांच्याबद्दल काही बातम्या सापडतात का ते बघितले. त्यात विश्वास न्यूज ला असे समाजले कि रायबरेली च्या आमदार अदिती सिंह यांना महिला विंग च्या महासचिव पदावरून काढले आहे.


विश्वास न्यूज ने खरं काय ते जाणून घेण्यासाठी अदिती सिंह यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनि असे स्पष्ट केले हि गोष्ट खोटी आहे. आणि काँग्रेस मधून काढल्या बद्दल त्या म्हणाल्या कि आज पर्यंत तशी त्यांना नोटीस किंवा तसे पात्र मिळालेले नाही.


४ जुन २०२० रोजी उत्तर प्रदेश च्या भाजप प्रवक्तांसोबत संपर्क साधला, प्रवक्ता राकेश त्रिपाठी यांनी पण व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. अदिती सिंह यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही.
आम्ही नंतर खोटी पोस्ट शेअर केलेल्या फेसबुक यूजर चा देखील तपास केला. त्यात आम्हाला कळले कि नरसिम्ह दीक्षित हे उत्तर प्रदेशच्या देवरिया चे रहिवासी आहेत. त्यांच्या टाइमलाईन वर आम्हाला पार्टी निगडित पोस्टचा सापडले.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात असे आढळले कि अदिती सिंह आणि त्यांच्या आईचे हे जुने छायाचित्र त्यांनी भाजपात प्रवेश केले अश्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे. या फक्त अफ़वाह आहे. सदर पोस्ट खोटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट