Fact Check: आदित्य ठाकरे यांच्या कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट सोबत केली खोडतोड, व्हायरल पोस्ट आहे खोटी
विश्वास न्यूज च्या तपासात आदित्य ठाकरे संबंधित पोस्ट खोटी असल्याचे समजले. टीव्ही ९ भारतवर्ष च्या ब्रेकिंग प्लेट सोबत खोडतोड करून हि पोस्ट बनवली गेली आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 24, 2021 at 11:39 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): महाराष्ट्र चे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना घेऊन सोशल मीडिया वर एक खोटा मेसेज व्हायरल होत आहे. यात यूजर्स दावा करत आहेत कि आदित्य ठाकरे हे एचआईवी पॉजिटिव आले आहेत.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि एका न्यूज चॅनेल च्या ब्रेकिंग प्लेट सोबत खोडतोड करून हे खोटे पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. टीव्ही ९ भारतवर्ष च्या ओरीजिनल प्लेट वर आदित्य ठाकरे हे कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे सांगितले गेले आहे. या प्लेट वरून कॉरोन हा शब्द हटवून त्या जागी HIV/AIDS या शब्दाचा वापर केला आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने २१ मार्च रोजी एक खोटी पोस्ट अपलोड केली, त्यावर लिहले होते, “सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे HIV/AIDS पॉजिटिव”
पोस्ट सोबत लिहले होते: “हमने तो कोरोना + सुना था ओ तेरी, पेंग्विन को नेहरू वाली बीमारी हो गई है…? गठबंधन की सरकार में ये बीमारी होना आम बात है, सभी को खुश करने के चक्कर में ये होता ही है“
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट ला निरखून बघितले. हि टीव्ही९ भारतवर्ष न्यूज ची ब्रेकिंग प्लेट आहे. यानंतर आम्ही त्यावर लिहलेल्या कन्टेन्ट ला युट्युब वर उपलोड करून सर्च केले.
सर्च च्या रिसल्ट ने आम्हाला सरळ त्या न्यूज पर्यंत पोहोचवले ज्यात सांगितले गेले होते कि सीएम उद्धव यांच्या मुलाला कोरोनाव्हायरस झाला आहे. हि पूर्ण बातमी तुम्ही इथे बघा.
तपासाच्या वेळी आम्हाला आदीत्य ठाकरे यांचा एक ट्विट देखील मिळाला. हा २० मार्च रोजी पोस्ट केला केला होता. त्यात त्यांनी सांगितले कि त्याची कॉरोन रिपोर्ट पॉसिटीव्ह आली आहे. ठाकरे यांनी खालील ट्विट केले.
तपासावेळी आम्हाला जागरण ओट कॉम वर देखील एक बातमी मिळाली. त्यात आदित्य ठाकरे हे पॉसिटीव्ह असल्याची माहिती दिली गेली आहे. हि बातमी इथे बघा.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने टीव्ही ९ भारतवर्ष च्या ऑफिस मध्ये संपर्क केला. चॅनेल च्या एडिटर ने आम्हाला सांगितले कि आदित्य ठाकरे वाली पोस्ट खोटी आहे.
व्हायरल छायाचित्रावर आम्हाला @OfficeOfSID लिहलेले दिसले. या नावाचे ट्विटर हॅन्डल आम्ही सर्च केले त्यात आम्हाला कळले कि या अकाउंट ला ट्विटर ने टेम्पररी सस्पेंड केले आहे, कारण या अकाउंट ने पॉलिसी चे उल्लंघन केले आहे. हे तुम्ही खाली बघू शकता.
शेवटी आम्ही पोस्ट बनवणाऱ्याचे तपास केले त्यात आम्हाला कळले कि जयभगवान त्यागी नावाचे यूजर हे दिल्ली चे रहिवासी आहेत. ते एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आदित्य ठाकरे संबंधित पोस्ट खोटी असल्याचे समजले. टीव्ही ९ भारतवर्ष च्या ब्रेकिंग प्लेट सोबत खोडतोड करून हि पोस्ट बनवली गेली आहे.
- Claim Review : Aaditya Thackeray HIV/AIDS positive
- Claimed By : जयभगवान त्यागी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.