X
X

Fact Check: सुवर्ण मंदिराच्या नावावर व्हायरल होत आहे खोटा मेसेज

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. गोल्डन टेम्पल कडून अशी कुठलीच घोषणा करण्यात आली नाही.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि संपूर्ण पंजाब मध्ये ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर चा खर्च सुवर्ण मंदिर करेल. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले.
सुवर्ण मंदिर च्या सुंदरीकरणाची जबाबदारी सांभाळणारी संस्था, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी पंजाब बहुतांश ठिकाणी कॉवीड सेंटर चालवत आहे, पण व्हायरल दावा खोटा आहे. या आधी देखील पीपीई किट च्या नावावर एक अशीच पोस्ट व्हायरल होत होती.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर परमजीत ढिल्‍लनने ८ मे रोजी रोजी एक पोस्ट अपलोड केली आणि लिहले: This is called service to humanity. Hope other religious trust across india. अपलोड पोस्ट मध्ये इंग्रजी मध्ये लिहले: Amritsar Golden temple has announced that the entire expense of oxygen, medicines and ventilators in whole of Punjab will be borne by the golden temple.

व्हायरल पोस्ट ला शोभा डे ने देखील आपल्या ट्विटर हॅन्डल वर ट्विट केले होते.

व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट च्या आधारावर गूगल ओपन सर्च सुरु केले. सर्च मध्ये आम्हाला एक पण अशी बातमी नाही मिळाली जी व्हायरल पोस्टला खरे सिद्ध करेल. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी च्या अधिकृत सोशल मीडिया अकॉउंट ला स्कॅन केले. त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर आम्हाला एक ट्विट मिळाला. यात शोभा डे च्या ट्विट ला उत्तर देत कमेटी ने सांगितले होते कि हा फेक मेसेज सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. अशी कुठलीच घोषणा श्री हरमंदिर साहिब या कमेटी कडून नाही केली गेली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही पंजाबी जागरण चे अमृतसर इन्चार्ज अमृतपाल सिंह यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि सुवर्ण मंदिर द्वारा संपूर्ण पंजाब चा ऑक्सिजन, औषध आणि व्हेंटिलेटर चा खर्च ते उचलत असल्याची पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. पण शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी कडून पंजाब मध्ये विविध शहरात कोविड सेन्टर बनवले गेले आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी ला त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून संपर्क केला. आम्हाला मिळालेल्या माहिती प्रमाणे हा व्हायरल मेसेज फेक आहे.

२३ एप्रिल २०२१ रोजी विश्वास न्यूज ने यासोबत मिळते जुळते एका पोस्ट छाटापास केला होता. यात पीपीई किट आणि व्हेंटिलेटर चा खर्च उचलण्याचे सांगितले गेले होते. हा फॅक्ट चेक तुम्ही इथे बघू शकता.

खोटी पोस्ट अपलोड करणाऱ्या यूजर चा आम्ही तपास केला. आमच्या सोशल स्कॅनिंग मध्ये आम्हाला कळले कि फेसबुक यूजर परमजीत ढिल्‍लन ने हे अकाउंट डिसेंबर २०१७ मध्ये बनवले. या पेक्षा जास्ती माहिती आम्हाला त्यांच्या अकाउंट वर मिळाली नाही.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. गोल्डन टेम्पल कडून अशी कुठलीच घोषणा करण्यात आली नाही.

  • Claim Review : संपूर्ण पंजाब मध्ये ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर चा खर्च सुवर्ण मंदिर उचलत आहे
  • Claimed By : यूजर परमजीत ढिल्‍लन
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later