Fact Check: सर्वात जुने झाड असल्याचा दावा करणारी ही पोस्ट बनावट आहे
हा दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला आढळले. आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने झाड ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन आहे, जे सुमारे 5000 वर्षे जुने आहे आणि यूएसए मध्ये आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Nov 15, 2021 at 02:21 PM
- Updated: Nov 17, 2021 at 04:00 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एका झाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगातील सर्वात जुने झाड आफ्रिकेतील टांझानियामध्ये असून ते ६ हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचा दावा या छायाचित्रासोबत केला जात आहे. हा दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला आढळले. आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने झाड ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन आहे, जे सुमारे 5000 वर्षे जुने आहे आणि यूएसए मध्ये आहे.
काय होत आहे व्हायरल?
एका झाडाचा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. असा दावा केला जातो की जगातील सर्वात जुने झाड टांझानिया, आफ्रिकेत आहे आणि ते 6000 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. वर्णन असे आहे, “जगातील सर्वात जुने झाड. 6000 वर्षे. टांझानिया. आफ्रिका.” ज्याचा मराठीत अनुवाद असा होतो – “जगातील सर्वात जुने वृक्ष. 6000 वर्षे. टांझानिया. आफ्रिका.”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
या पोस्टची चौकशी करण्यासाठी, आम्ही कीवर्ड शोधाची मदत घेतली. कीवर्डसह शोधताना आम्हाला guinnessworldrecords.com वर एक लेख सापडला. या लेखानुसार, जगातील सर्वात जुने झाड अमेरिकेतील नेवाडा येथे होते. आर्टिकल प्रमाणे, “एका झाडाचे वय सुमारे 5,200 वर्षे नोंदवले गेले. हे ब्रिस्टलकोन पाइन (पिनस लाँगेवा) 1963 मध्ये नेवाडा, यूएसए मधील माउंट व्हीलर येथून काढले गेले. हे झाड सुमारे 5,200 वर्षे जुने होते.”
आम्हाला guinnessworldrecords.com वर दुसरा लेख सापडला. यानुसार जगातील सर्वात जुने जिवंत झाड अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. लेखानुसार, “जगातील सर्वात जुने झाड म्हणजे व्हाईट माउंटन, कॅलिफोर्निया, यूएसए मधील ब्रिस्टलकोन पाइन (पिनस लाँगेवा) आहे. हे 4,800 वर्षांहून अधिक जुने असल्याचे आढळून आले (2020 पर्यंत 4,852 वर्षे); या वयाची पुष्टी नंतर डेंड्रोक्रोनोलॉजिस्ट टॉम हार्लन यांनी ऍरिझोना विद्यापीठातील ट्री-रिंग संशोधन प्रयोगशाळेत केली. हे झाड सध्या जगातील सर्वात जुने सत्यापित जिवंत वृक्ष आहे.”
तसेच अमेरिकेच्या rmtrr.org पिनस लाँगेवा नुसार, ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन ही जगातील सर्वात जुनी झाडे आहेत आणि सुमारे 5000 वर्षे जुनी आहेत.
व्हायरल इमेजच्या गूगल रिव्हर्स इमेज सर्चवर, आम्हाला हे चित्र 17 जानेवारी 2013 रोजी flickr.com वर अपलोड केलेली आढळली. येथे उपलब्ध माहितीनुसार, या झाडाचे नाव बाओबाब वृक्ष आहे. कीवर्ड शोध करून, आम्हाला आढळले की बाओबाब झाडाचे सरासरी वय 1,100 ते 2,500 वर्षांच्या दरम्यान आहे.
अधिक पुष्टीकरणासाठी, आम्ही दिल्ली विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर गीता यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले, “जगातील सर्वात जुने झाड म्हणजे अमेरिकेतील पिनस लाँगेवा, ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन, ज्यांचे सर्वात जुने वय सुमारे 5000 वर्षे आहे. आफ्रिकेत आढळणाऱ्या बाओबाब वृक्षांचे सर्वात जुने वय सुमारे 3000 वर्षे आहे.
ही पोस्ट Basavarajaiah Honnagangaiah नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केली आहे. वापरकर्त्याने त्याची वैयक्तिक माहिती लपवली आहे.
निष्कर्ष: हा दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला आढळले. आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने झाड ग्रेट बेसिन ब्रिस्टलकोन पाइन आहे, जे सुमारे 5000 वर्षे जुने आहे आणि यूएसए मध्ये आहे.
- Claim Review : Oldest tree in the world. 6000 years. Tanzania. Africa.
- Claimed By : Basavarajaiah Honnagangaiah
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.