X
X

Fact Check: टमाटर व्हायरस ला कोरोनाव्हायरस पेक्षा जास्ती घातक सांगणारी पोस्ट खोटी आहे

टमाटर व्हायरस ला कोरोनाव्हायरस पेक्षा पण घातक सांगणारी पोस्ट खोटी.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट-चेकिंग व्हाट्सअँप चेटबॉट (+91 95992 99372) वर फॅक्ट-चेक साठी एक पोस्ट मिळाली. पोस्ट प्रमाणे टमाटर वर एक नवीन व्हायरस मिळाला आहे जो कोरोनाव्हायरस पेक्षा जास्ती घातक आहे, पोस्ट मध्ये लोकांना सल्ला देण्यात येत आहे कि टमाटर खाऊ नका. या पोस्ट मध्ये व्हायरस च नाव #TirangaVirus सांगितले गेले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग चॅट-बोट वर एक पोस्ट मिळाली ज्यात लिहले होते, “टमाटर में कोरोना से भी खतरनाक एक नया वायरस मिला है। टमाटर से दूर रहें। यह वायरस कोरोना से भी ज्यादा खतरनाक है। #tirangavirus” हाच दावा आम्हाला फेसबुक वर पण एका पोस्ट मध्ये मिळाला. Arvind Singh Chauhan नावाच्या फेसबुक यूजर ने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हाच दावा करण्यात आला होता. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने या संबंधी फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) चे जॉईंट डायरेक्टर (स्टैंडर्ड्स) डॉक्टर एसी मिश्रा यांच्यासोबत वार्तालाप केला. त्यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले, ते म्हणाले, “हा दावा खोटा आहे. जसा व्हायरल पोस्ट मध्ये दावा केला गेला आहे, तशी कुठलीच माहिती आमच्या कडे अजून पर्यन्त पोहोचली नाही आहे. घाबरायची काहीच गरज नाही.”

https://twitter.com/beardbengali/status/1261226355443658753

आम्ही तपास पुढे वाढवला आणि कळले कि एक यूजर ने या संबंधी हिंदी न्यूज चॅनेल टीव्ही 9 भारतवर्ष ची कॅलिपींग ला ट्विट केली आहे. सोशल मीडिया वर देखील काही यूजर्स ने हि क्लिप शेअर केली आहे, आम्ही या मागचं सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र चे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने देखील ट्विट करून लिहले, “एक हिंदी न्यूज चैनल ने 13 मई को महाराष्ट्र में टमाटरों में #Tiranga_virus के बारे में रिपोर्ट दिखाई है। इसके तुरंत बाद कीमतें काफी गिर गईं और टमाटर किसानों को भारी नुकसान हुआ। ऐसी गैरजिम्मेदाराना रिपोर्टिंग की सजा अवश्य मिलनी चाहिए। सरकार किसानों को मुआवजा दे।”
अर्थात: एका हिंदी न्यूज चॅनेल ने १३ मे रोजी महाराष्ट्रात टमाटर मध्ये #Tiranga_virus बद्दल रिपोर्ट दाखवली आहे. या नंतर लगेच टमाटर च्या किमती पडल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. असा बेजबाबदारपणा रिपोर्टींग मध्ये दाखवणाऱ्या लोकांना लगेच शिक्षा देण्यात यावी. सरकार ने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

एग्री न्यूज च्या वेबसाईट च्या रिपोर्ट प्रमाणे, “डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर को-ऑपरेशन एंड फार्मर्स वेलफेअर (DAC&FW) चे हॉर्टिकल्चर कमिश्नर डॉक्टर बीएनएस मूर्ति ने न्यूज चँनेल टीव्ही ९ द्वारा दाखवल्या गेलेल्या बातमी वर सख्त टिपण्णी केली आहे. या बातमीत चुकीची माहिती दिली गेली आहे कि तिरंगा व्हायरस हा कॉरोनव्हायरस पेक्षा जास्ती घातक आहे.

आम्ही तिरंगा व्हायरस बद्दल इन्टरनेट वर माहिती काढण्याचा प्रयत्न केला. आम्हाला 2 मई 2020 रोजी इंडियन एक्सप्रेस च्या वेबसाईट वर प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. यात सांगितले गेले आहे कि महाराष्ट्रात, टमाटर उत्पादकांनी एका अज्ञात आजार बद्दल माहिती दिली, ज्यामुळे टमाटर लौकर पिकतात आणि त्यामुळे त्यांना बराच नुकसान सहन करावा लागत आहे.

या रिपोर्ट मध्ये कुठेच कॉरोन व्हायरस बद्दल सांगितले गेले नाही आहे ज्यामुळे टमाटर पासून मनुष्यांना धोका होईल.

आम्हाला एक व्हिडिओ देखील मिळाला, ज्यात टीव्ही 9 भारतवर्ष सांगत आहे कि सोशल मीडिया वर एक अफवा पसरली आहे कि टमाटर मध्ये सापडलेला नवीन व्हायरस हा मनुष्यांना देखील प्रभावित करू शक्ती. हे सत्य नाही. इथे खाली तुम्ही हा युट्युब व्हिडिओ बघू शकता.

टीव्ही 9 भारतवर्ष ने आपली ती भ्रामक रिपोर्ट हटवली आहे, ज्यात दावा केला गेला आहे कि टमाटर व्हायरस लोकांचा जीव घेऊ शकतो.

निष्कर्ष: टमाटर व्हायरस ला कोरोनाव्हायरस पेक्षा पण घातक सांगणारी पोस्ट खोटी.

  • Claim Review : टमाटर व्हायरस कोरोनाव्हायरस पेक्षा जास्ती घातक
  • Claimed By : WhatsApp user
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later