Fact Check: सीमा हैदर प्रकरणाशी जोडून पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ खोट्या दाव्यांसोबत केला जात आहे व्हायरल
- By: Pragya Shukla
- Published: Jul 30, 2023 at 10:09 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). आपल्या मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाशी जोडून पंतप्रधान मोदींचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी सीमा हैदरला अटक करण्याचे आदेश दिल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
विश्वास न्यूजला आपल्या चौकशीत आढळले की, व्हायरल व्हिडिओबद्दल करण्यात आलेले दावे खोटे आहेत. पंतप्रधान मोदींचे सर्व व्हिडीओ जुने आहेत. या व्हिडीओमध्ये पहिला व्हिडीओ 2017च्या हिवाळी अधिवेशनादरम्यानचा आहे, तर दुसरा व्हिडीओ 2016मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या रॅलीचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वापरकर्ता ‘एसएफ (SF)’ने व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा हैदरला अटक करण्याची घोषणा केली आहे. सीमा हैदर सोशल मीडिया आणि मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेव्हापासून सीमा भारतात आली आहे, तेव्हा ती गुप्तहेर आहे की नाही याबद्दल सतत चर्चा होत आहे. दरम्यान, झी मीडिया (ZEE MEDIA)शी बोलताना तिने सांगितले की, ती 6 लाख रुपये खर्च करून भारतात आली आहे. तेव्हापासून इतका पैसा कुठून आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
या पोस्टची संग्रहित लिंक इथे पहा.
आणखी एक वापरकर्ता, ‘न्यू व्हायरल’ने हा व्हिडीओ शेअर करताना असाच दावा केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा हैदरला अटक केल्याची घोषणा केली आहे. सीमा हैदर सोशल मीडिया आणि मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेव्हापासून सीमा भारतात आली आहे, तेव्हा ती गुप्तहेर आहे की नाही, याबद्दल सतत चर्चा होत आहे. या दरम्यान, झी मीडिया (ZEE MEDIA)शी बोलताना तिने सांगितले की, ती 6 लाख रुपये खर्च करून भारतात आली आहे. तेव्हापासून इतका पैसा कुठून आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
या पोस्टची संग्रहित लिंक इथे पहा.
तपास
या व्हायरल दाव्याचे सत्य शोधण्यासाठी, आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड्सने शोध घेण्यास सुरुवात केली. दैनिक जागरणच्या वेबसाइटवर 18 जुलै 2023 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, “सीमा हैदरच्या प्रकरणात, एटीएस (ATS)द्वारे सीमा हैदर, तिचा हिंदुस्तानी पती सचिन, सचिनचे वडील नेत्रपाल यांची चौकशी केली जात आहे. एटीएस (ATS)ने सोमवारी दुपारी 2.30 वाजता सचिन आणि सीमा यांना त्यांच्या रबुपुरा निवासस्थानी सोडले होते. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता पाकिस्तानी महिला, तिची एक मुलगी आणि एक मुलगा आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना पुढील चौकशीसाठी एटीएस (ATS) घेऊन गेली आहे.
तपासादरम्यान पंतप्रधान मोदींनी सीमा हैदरला अटक करण्याचे आदेश दिले असल्याची कोणतीही बातमी आम्हाला मिळालेली नाही.
या व्हायरल व्हिडीओचे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी 2017मध्ये बोलत असल्याचे दिसून येत आहे. या आधारावर, आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड्सने शोध घेतला. 7 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे आढळले. उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर भाषण करत होते.
दुसऱ्या व्हिडिओबद्दल जाणून घेण्यासाठी, आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड्सने शोध घेतला. नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आम्हाला खरा व्हिडीओ आढळला. डिसेंबर 2016मध्ये हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये पंतप्रधान मोदींनी एक रॅली केली होती, त्याच रॅलीचा हा व्हिडिओ आहे.
अधिक माहितीसाठी, आम्ही दैनिक जागरणच्या ग्रेटर नोएडाचे रिपोर्टर अर्पित त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा चुकीचा आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस (ATS) टीमकडून सीमा हैदर आणि सचिनच्या कुटुंबीयांची सतत चौकशी केली जात आहे.
अखेर, आम्ही चुकीच्या दाव्यासह पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की वापरकर्ता असेच खोटे दावे शेअर करतो. वापरकर्त्याला 6.7 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्षः विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले की पंतप्रधान मोदी यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल करण्यात आलेले दावे खोटे आहेत. पंतप्रधान मोदींचे दोन्ही व्हिडीओ जुने आहेत. पहिला व्हिडिओ 2017च्या हिवाळी अधिवेशनादरम्यानचा आहे, तर दुसरा व्हिडिओ 2016मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या रॅलीचा आहे.
- Claim Review : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा हैदरला अटक करण्याची घोषणा केली.
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता एसएफ (SF)
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.