Fact Check: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केले नव्हते हे विधान, बनावट पोस्ट व्हायरल
- By: Jyoti Kumari
- Published: Jun 20, 2023 at 04:35 PM
नई दिल्ली (विश्वास न्यूज). माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने एका ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे ट्विट केल्याचा दावा केला जात आहे.
विश्वास न्यूजने या व्हायरल ट्विटची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे ‘@manmohan_5’ हे ट्विटर अकाऊंट, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अधिकृत अकाऊंट नाही. मनमोहन सिंग हे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीत. व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
‘बळवंत पटेल‘ या फेसबुक वापरकर्त्याने 7 जून रोजी व्हायरल झालेल्या ट्विटरचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे की, “मोदींना विरोध करणाऱ्यांनी मनमोहन सिंग काय बोलत आहेत ते जरूर पाहावे.”
स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, ‘मोठे मोठे निर्णय मी सुद्धा घेत असे, पण काँग्रेसने मला कधीही माझ्या मर्जीने कोणतेही काम करू दिले नव्हते, नरेंद्र मोदी स्वत: निर्णय घेतात, त्यामुळे देशाची प्रगती होत आहे.’ आज मी मोकळेपणाने बोलतो की, मोदींसारखा नेता आणि पंतप्रधान संपूर्ण जगात पुन्हा जन्माला येणार नाही.’
पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहिली जाऊ शकते.
तपास
तपास सुरू करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम गुगल ओपन सर्चचा वापर केला. आम्ही संबंधित कीवर्डसह गुगलवर सर्च केले. व्हायरल दाव्याशी संबंधित आमच्याकडे कोणतेही विश्वसनीय मीडिया रिपोर्ट नाहीत. पण शोधाच्या दरम्यान आम्हाला कळले की हा दावा बराच काळ व्हायरल होत आहे. तपास पुढे नेत आम्ही ट्विटरवर स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे ट्विटर हँडल @manmohan_5 सर्च केले. हे अकाऊंट आता ट्विटरवर नाही.
आम्ही वेबॅक मशीनद्वारे त्याच्या ट्विटर हँडलचे आर्काइव्ह काढले. यावर 2021 मध्ये अनेक ट्विट करण्यात आले होते. व्हायरल ट्विट 23 सप्टेंबर 2021 आणि 24 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.
यापूर्वीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने काही ट्विट्स खोट्या दाव्यासह शेअर करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय संयोजक सरल पटेल यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. 19 जून 2020 रोजी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, हे अकाऊंट खरे आहे की नाही, असा प्रश्न विचारून लोक कंटाळले आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही आणि शेवटचीही नाही, म्हणून मी हे एकदा स्पष्ट करत आहे. जर सोनियाजी किंवा एमएमएसजींनी ट्विटर जॉईन करण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट असेल. त्यामुळे कृपया बनावट अकाऊंटला फॉलो करु नका.
तपासा दरम्यान आम्हाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने तयार करण्यात आलेले अनेक फॅन अकाऊंट सापडले. याआधीही याच दाव्यासह हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या वेळची आमची फॅक्ट चेक स्टोरी तुम्ही इथे वाचू शकता.
अधिक माहितीसाठी आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रणव झा यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. मनमोहन सिंग ट्विटरवर नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
तपासाअंती आम्ही ‘बळवंत पटेल’ या बनावट वापरकर्त्याच्या प्रोफाइलचे सोशल स्कॅनिंग केले. फेसबुकवर या वापरकर्त्याचे 5 हजार मित्र आहेत. वापरकर्त्याच्या प्रोफाईलवरील उपलब्ध माहितीनुसार, तो ब्रिटनचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. मनमोहन सिंग यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट नाही. व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
- Claim Review : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.
- Claimed By : बळवंत पटेल
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.