Fact Check: इस्त्राइलमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकही मृत्यू न होणे आणि लिंबू व बायकार्बोनेटच्या चहामुळे रोग बरा होणे हे दावे खोटे आहेत

पोस्टचा हा दावा खोटा आहे की कोरोना व्हायरसमुळे इझ्रराइलमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. त्याचबरोबर हा दावा पण खोटा आहे की लिंबू आणि बायकार्बोनेट मिसळून तयार केलेला गरम चहा कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा उपचार करायला वापरता येतो.

नवी दिल्ली (विश्वास टीम). एक एप्रिल 2020 रोजी सोशल मिडिया वर एक व्हायरल पोस्ट शेयर केली गेली आहे. यात दावा केला जात आहे की कोरोना (COVID-19) व्हायरसच्या संक्रमणामुळे इस्त्राइलमध्ये अजून एकही मृत्यू झालेला नाही. यात पुढे असाही दावा केला आहे की लिंबू आणि बायकार्बोनेट वापरून बनवलेला चहा या व्हायरसला त्वरित नष्ट करतो. विश्वास न्यूजच्या तपासणीत हा व्हायरल दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिले आहे

सोशल मिडिया वर शेयर केल्या जाणाऱ्या या पोस्टमध्ये लिहिले आहे, “इस्त्राइलमध्ये C-19 मुळे एकही मृत्यू नाही! त्यांनी  एक उत्तम बातमी सांगितली. मला जशी माहिती मिळाली तशी मी सांगतो आहे. C-19 व्हायरसचा उपचार किंवा त्याला नष्ट करण्याची पद्धत सापडली. इस्त्राइलमधून बातमी आहे की तिथे व्हायरसमुळे एकही मृत्यू झालेला नाही. रेसिपी सोपी आहे. पहिले लिंबू आणि दुसरे बायकार्बोनेट. दोन्ही मिसळून रोज दुपारी गरम चहा सारखे प्यावे. लिंबू आणि गरम बेकिंग सोडा मिळून व्हायरसला लगेच नष्ट करतील आणि तुमच्या शरीरातून पूर्णपणे काढून टाकतील. हे दोन्ही घटक रोगप्रतिकार शक्तीला अल्क बनवतात. रात्र झाली की रोगप्रतिकार शक्ती आम्ल होते आणि कमकुवत होते. म्हणूनच इस्त्राइलमधील लोक व्हायरसमुळे घाबरलेले नाहीत, ते रिलॅक्स आहेत. इस्त्राइलमध्ये प्रत्येकजण रात्री एक कप गरम पाण्यात लिंबू आणि थोडा बेकिंग सोडा मिसळून पितात कारण हे सिद्ध झाले आहे की यामुळे व्हायरस नष्ट होतो. मी माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना हे सांगितले आहे जेणेकरून आम्हाला या व्हायरसचे संक्रमण होऊ नये. आता मी तुमच्यावर सोडत आहे. कृपया हे पुढे पाठवा.”

या पोस्टची आर्काइव्हड आवृत्ती इथे पाहू शकता.

तपासणी

या व्हायरल पोस्टचा पहिला दावा असा आहे की इस्त्राइलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. विश्वास न्यूजच्या तपासणीत असे आढळले की WHO यांच्याप्रमाणे 1 एप्रिल 10:00 CET पर्यंत इस्त्राइलमध्ये 5129 कन्फर्म रुग्ण होते आणि त्यापैकी 21 रुग्णांची मृत्यू झाली आहे.

म्हणून या पोस्टचा पहिला दावा खोटा ठरला की इस्त्राइलमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकही मृत्यू झालेला नाही.

दुसरा दावा असा आहे की लिंबू आणि बायकार्बोनेट वापरून बनवलेला चहा कोरोना व्हायरसला नष्ट करतो.

विश्वास न्यूजला WHOच्या नवीनतम पियर रिव्हीयुड साइंटिफिक फाइंडिंग डेटाबेसमध्ये Covid-19 संबंधी लिंबू किंवा बायकार्बोनेट याचा उल्लेख सापडला नाही.

व्हायरल पोस्टचा दावा आहे की लिंबू आणि बायकार्बोनेट रोगप्रतिकार प्रणालीला अल्क बनवतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातून कोरोना व्हायरस बाहेर फेकला जाईल.

हा खोटा दावा अशा सिद्धांतापासून निर्माण झाला असेल की अल्कलायझिंग डायटमुळे कर्करोग रोखता येतो. डिसेंबर 2019 मध्ये पण अशीच एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यात असा दावा केला होता की बेकिंग सोडा कर्करोगाच्या उपचारासाठी वापरता येतो. दाव्यात असे म्हटले होते की यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती अल्क होते आणि कर्करोगाच्या पेशींना बाहेर फेकते.

ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर मनीष सिंघल यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कितीही बायकार्बोनेट घेतले तरीही तुमचे मूत्रपिंड त्याला शरीराबाहेर फेकते. कोणत्याही शरीराचे नैसर्गिक pH 7.35 ते 7.45 असते आणि ते त्याच पातळीवर स्थिर असते. जोपर्यंत काही गडबड होत नाही तोपर्यंत आपले शरीर निरंतर त्याला संतुलित करत असते.

विश्वास न्यूजने इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर निखिल मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या दाव्याला खोटे ठरवत असे म्हटले की, “हे खोटे आहे. याचा कोणताही पुरावा नाही की गरम चहा वापरून उपचार करता येतो. आजपर्यंत कोरोना संक्रमणासाठी कोणताही उपचार उपलब्ध नाही. या दाव्याचे वैज्ञानिक दृष्ट्या पुष्टीकरण करता येत नाही.”

मोहन काशीरा नावाच्या युझरने ही पोस्ट फेसबुकवर शेयर केली आहे. सोशल प्रोफायलिंग केल्यावर आम्हाला कळले की ते बेंगळूरू येथे राहतात.

निष्कर्ष: पोस्टचा हा दावा खोटा आहे की कोरोना व्हायरसमुळे इझ्रराइलमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. त्याचबरोबर हा दावा पण खोटा आहे की लिंबू आणि बायकार्बोनेट मिसळून तयार केलेला गरम चहा कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा उपचार करायला वापरता येतो.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट