विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी ठरली. २००७ पासून मालगाड्याच्या प्रचालनात खासगी कंपन्या भाग घेत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर मालगाडीच्या काही डब्ब्यांचे छायाचित्र शेअर केलेले दिसतात, त्या छायाचित्रासोबत दावा केला जात आहे कि केंद्रात असलेल्या भाजप सरकार ने भारतीय रेल अदानी यांना विकली.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला त्यात असे कळले कि २००७ साल पासून मालगाड्यांच्या परिचालनात (ऑपेरेशन) मध्ये प्रायव्हेट कंपन्या भाग घेत आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘I am with Priyanka Gandhi’ वर १९ डिसेंबर रोजी दोन छायाचित्र अपलोड केले, त्यात लिहले होते: ‘कांग्रेस सरकार में ट्रेनों पर भारतीय रेल लिखा होता था,
भाजपा सरकार में अड़ानी रेल लिखा होता है।’
अर्थात: काँग्रेस सरकार मध्ये ट्रेन वर भारतीय रेल लिहले असायचे, पण भाजप सरकार मध्ये अदानी रेल लिहले असते
पोस्ट मध्ये वापरल्या गेलेल्या छायाचित्रात मालगाडीच्या रॅक वर अदानी लिहलेले दिसते. व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाची सुरुवात आम्ही युट्युब पासून केली, अदानी रेल सारखे कीवर्डस आम्ही युट्युब वर टाकले, आम्हाला युट्युब वर बरेच असे व्हिडिओस सापडले जिथे मालगाड्यांच्या डब्यावर अदानी लिहलेले दिसते.
एमजी रेल नावाच्या एका युट्युब चॅनेल वर ५ मार्च २०१९ रोजी एक अश्याच मालगाडी चा व्हिडिओ अपलोड केलेला दिसला. इथे पण डब्ब्यांवर अदानी लिहलेलं स्पष्ट दिसतं.
टाइमलाईन टूल च्या माध्यम चा उपयोग करून आम्हाला बरेच जुने व्हिडिओ मिळाले. सगळ्यात जुना व्हिडिओ आम्हाला ५ जानेवारी २०१३ चा असल्याचे कळले. यात दिसत असलेल्या मालगाडी वर पण अदानी लिहले असल्याचे दिसते. युट्युब डेटाव्यूअर च्या मदतीने आम्ही व्हिडिओ चा अपलोड टाइम काढला.
पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही गूगल सर्च ची मदत घेतली. सर्च च्या वेळी आम्हाला पाच जानेवारी २००७ ची एक बातमी मिळाली. इकॉनॉमिक टाइम्स च्या बातमी प्रमाणे, कॅन्टेनर ट्रेन चालवायला भारतीय रेल्वे ने पहिल्यांदा खाजगी कंपन्यांसाठी दार उघडले आहे. त्यावेळी रेल्वे मिनिस्टर लालू प्रसाद यादव होते. केंद्रात युपीए सरकार होती. अदानी लॉजिस्टिक पण या कंपन्यांमध्ये सहभागी होती. पूर्ण बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
सर्च च्या वेळी आम्हाला २००७ ची इकॉनॉमिक टाइम्स मधली अजून एक बातमी मिळाली. यात सांगितले गेले होते कि ऑगस्ट २००७ मध्ये अदानी यांची कंपनी लौकरच कंटेनर ट्रेन सुरु करू शकते. पूर्ण बातमी इथे वाचा.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात भारतीय रेल्वे च्या जनसंपर्क अधिकारी सोबत संपर्क साधला. त्यांनी व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. आणि म्हंटले कि खासगी कंपन्यांचे आपले रॅक असतात. हे म्हणणे चुकीचे आहे कि भारतीय रेल अदानी रेल झाली आहे.
तपासाचा शेवट आम्ही फेसबुक पेज ‘I am with Priyanka Gandhi’ यांच्या सोशल सकॅनिंग पासून केला. आम्हाला त्यात कळले कि या पेज ला चार लाख पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. हा पेज ऑगस्ट २०१७ मध्ये बनवला गेला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी ठरली. २००७ पासून मालगाड्याच्या प्रचालनात खासगी कंपन्या भाग घेत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923