X
X

Fact Check: स्वामी प्रसाद मौर्य स्वस्थ आहेत, त्यांच्या हेल्थ वरून खोटा दावा व्हायरल

विश्वास न्यूजने व्हायरल दावा तपासला आणि तो खोटा असल्याचे आढळले. स्वामी प्रसाद मौर्य यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, ते निरोगी आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. त्यानंतर त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या दाव्याचा तपास केला असता तो खोटा असल्याचे आढळून आले. स्वामी प्रसाद मौर्य यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, ते निरोगी आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर विजय जैन सूर्यवंशी ने वायरल पोस्ट शेअर केली आणि त्यात लिहले: “दिल का दौरा पड़ने से बहोस हुए स्वामी प्रसाद मौर्य, लखनऊ के मेदांता अस्पताल में कराया गया भर्ती।”

पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघू शकता. सोशल मीडिया वर अन्य यूजर देखील हा दावा शेअर करत आहेत.

तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अनेक कीवर्डद्वारे Google वर शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला 20 मार्च 2022 रोजी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट पोस्ट केलेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक ट्विट आढळले. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे हृदय इतके कमजोर नाही की भ्याडांच्या भीतीमुळे मला हृदयविकाराचा झटका येईल. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांनी कृपया भ्याडपणा दाखवू नका. मी पूर्णपणे निरोगी आहे आणि अजूनही निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटत आहे.”

आम्ही समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज काका यांच्याशी सखोल पुष्टी करण्यासाठी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, ते निरोगी आहेत. आदल्या दिवशी राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त सपा कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात आमच्यासोबत स्वामी प्रसाद मौर्य यांचाही सहभाग होता.

तपासाअंती, आम्ही दावा शेअर करणाऱ्या विजय जैन सूर्यवंशी या फेसबुक वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की फेसबुकवर यूजर चे सुमारे 5 हजार मित्र आहेत. विजय जैन सूर्यवंशी हे उत्तर प्रदेशातील जसराना शहरातील रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल दावा तपासला आणि तो खोटा असल्याचे आढळले. स्वामी प्रसाद मौर्य यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, ते निरोगी आहेत.

  • Claim Review : दिल का दौरा पड़ने से बहोस हुए स्वामी प्रसाद मौर्य, लखनऊ के मेदांता अस्पताल में कराया गया भर्ती।
  • Claimed By : जैन सूर्यवंशी
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later